kalpita patil may contest vidhan sabha election rural jalgaon
kalpita patil may contest vidhan sabha election rural jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी देणार 'या' तरुण चेहऱ्याला संधी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सोडून जात आहेत. त्यानुसार राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्याचं केलं आहे. अशाच एका तरुण चेहऱ्याला जळगाव ग्रामीणमधून संधी देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कल्पिता पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संमती दिली असल्याचेही बोलले जात आहे.

कल्पिता पाटील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत तसेच त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली, शरद पवारांनीही त्यांना आशीर्वाद दिला आहे. तशा आशयाची फेसबुक पोस्टही त्यांनी केली आहे.

जळगाव ग्रामीणमधून सध्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आमदार आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचं आव्हान होतं, मात्र घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे त्यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे. देवकरांचं नाव मागं पडण्याच्या शक्यतेनं राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यात आता कल्पिता पाटील यांनी उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली. पक्षाकडून त्यांना काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचं कळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT