Crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्यानेच केला काकाचा खून

या खुनाचा तालुका पोलिसांनी चोवीस तासांत लावला छडा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : अंबोडे (ता. धुळे) येथील खुनाचा तालुका पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचा खून केल्याचे समोर आले आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२ जूनला अंबोडे (ता. धुळे) शिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. दगडू जगताप (रा. अंबोडे ता. धुळे) यांनी आपल्या शेत बांधावरील गवत जाळले. त्या वेळी गवतामध्ये फेकलेला मानवी मृतदेह आढळून आला. आगीमुळे मृतदेहावरील कपडे काहीअंशी जळाले होते. शेतकऱ्याने धुळे तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तपासात ज्ञानेश्‍वर रामभाऊ राठोड (वय २५, रा. रणाईचे तांडा, ता. अमळनेर) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या पोटावर, पाठीवर, तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले होते. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्यानंतर पथकाने मृत ज्ञानेश्‍वर राठोड यांचा पुतण्या जगदीश बबलू राठोड (रा. रणाईचे तांडा ता. अमळनेर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्याने काका ज्ञानेश्‍वर राठोड यांना रणाईचे तांडा येथून दुचाकीवर अंबोडे शिवारात निर्जनस्थळी आणले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे अनिल महाजन, सागर काळे, सुनील विंचूरकर, प्रवीण पाटील, सोमनाथ कांबळे, योगेश पाटील, प्रमोद पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाट, राकेश मोरे, योगेश पाटील, विशाल गुरव यांनी या घटनेची उकल करत संशयिताला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT