crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शेती हडपण्यासाठी वृद्ध महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राजवाडेनगरातील वृद्धेची शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करून खून झाला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पाच वर्षांनंतर संशयित पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.(Killing an old woman to grab farm dhule crime news )

जमीलाबी रहमान मोहंमदी (वय ८५) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत हबीब अब्दुल कादर षुकी (वय ८२, रा. लेमिन्टन रोड, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार दीपक लक्ष्मण सोनवणे (रा. प्लॉट क्रमांक १००, मिरजकरनगर, चाळीसगाव रोड, धुळे), तौसिफ अब्दुल हाफिज अन्सारी, अब्दुल हाफिज अन्सारी, नजीर मांडवाला, आसिफ शाह (सर्व रा. देवपूर, धुळे) यांनी कट रचून हबीब षुकी यांची मोहाडी शिवारातील शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने जमिलाबी यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करून ठार केले.

तसेच परस्पर दफनविधी करून पुरावा नष्ट केला. हबीब यांचा मोबाईल चोरी करून ठार करण्याची धमकी दिली. हा प्रकार १२ ऑक्टोबर २०१८ ला घडला. त्यानुसार संशयित पाच जणांवर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT