Suspect Ganesh Sonavane
Suspect Ganesh Sonavane esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : शहरात प्राध्यापकावर चाकूहल्ला

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : शहरातील गजबजलेल्या करवंद नाका परिसरात भरदुपारी प्राध्यापकावर (Professor) चाकूहल्ला (Knife Attack) करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. ११) घडली. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून, मित्रांवर दाखल केलेला गुन्हा (Crime) मागे घ्यावा, यासाठी दहशत माजविण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश तथा सिद्धेश विजय सोनवणे व टिप्या माळी (दोघे रा. वरवाडे, शिरपूर), विजय तथा कव्वा संतोष सारसर (रा. शिरपूर कोर्टासमोर) अशी संशयितांची नावे आहेत. (knife attack on a professor in shirpur Dhule Crime News)

करवंद नाका परिसरात साईबाबा कॉलनीत प्रा. अमोल राजेंद्र पवार (वय ३०) राहतात. त्यांच्या मालकीचे करवंद नाक्यावर अमोल मेडिकल स्टोअर्स आहे. शनिवारी दुपारी साडेतीनला ते दुकानावर होते. पाण्याचा जार भरत असताना तीन संशयित त्यांच्याजवळ पोचले. ‘माझ्या मित्राचे नाव घेशील तर तुला सोडणार नाही, तू केस कसा मागे घेत नाही तेच पाहतो’, असे सांगून त्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर अमोल पवार यांना रस्त्यावर ओढत नेऊन मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून त्यांचे आई-वडील मदतीसाठी धावले. संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. संशयितांपैकी एकाने अमोलवर चाकूने वार केले. त्यानंतर परिसरातील लोक मदतीसाठी धावले. त्यांनी चाकू मारणाऱ्यास धरून ठेवले. पवार यांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिल्याने ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

...अशी आहे पार्श्वभूमी

अमोलचे वडील राजेंद्र पवार १३ मेस विखरण (ता. शिरपूर) येथून भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून शिरपूरला परत येत असताना रात्री त्यांची चारचाकी अडवून दीड लाखांचे दागिने लुटल्याचा गुन्हा घडला होता. एका संशयिताची त्यांनी ओळख पटवून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा चाकूहल्ला झाल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT