kyungya-thinale
kyungya-thinale 
उत्तर महाराष्ट्र

‘कॅट’च्या मुशीत घडला भूतानचा पहिला एव्हिएटर

सकाळवृत्तसेवा

नाशिक - मित्र देश भूतानच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराकडून नियमित प्रशिक्षण दिले जाते. पण स्वतःचे हवाई दल नसलेल्या भूतानचा एव्हिएटर ‘कॉम्बट आर्मी एव्हिएशन’ने (कॅट) शनिवारी घडविला. त्यामुळे भूतानच्या हवाई सज्जतेच्या इतिहासच येथे रचला गेला. 

भारतीय लष्करासह इतर देशांतील लष्करी अधिकाऱ्यांना सामरिक तंत्रज्ञानाचे धडे देणाऱ्या गांधीनगर येथील ‘कॅट’मध्ये अनोखा इतिहास रचला गेला. भूतानला स्वतःचे नौदल किंवा हवाई दल नाही. तेथील सुरक्षेची जबाबदारी भारतीय लष्कराकडून पेलली जाते. त्यांच्या अधिकाऱ्यांना भारतीय लष्कर प्रशिक्षण देते. मित्रदेशाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना काही देशांच्या अधिकाऱ्यांना ‘कॅट’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत शनिवारी भूतानचे एक अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करणारे एव्हिएटर ठरले. क्‍युन्गा थिनले असे या लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. ‘कॅट’मध्ये आज २९ व्या तुकडीतील जवानांना ‘विंग’ प्रदान करण्यात आले, तर तिसाव्या तुकडीतील एव्हिएटरचा सन्मान झाला. त्यात क्‍युन्गा थिनले यांनी ‘कॅट’चा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT