Shubham-Sharma
Shubham-Sharma 
उत्तर महाराष्ट्र

मजुराचा मुलगा झाला ‘प्रोफेशनल क्रिकेटर’

रईस शेख

जळगाव - भुसावळमधील गरीब हातमजूर कुटुंबातील तरुणाने आंतरराज्यीय व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले असून, तो हैदराबादच्या ‘रेड रोज’ या मसाला कंपनीतर्फे दिल्लीत कॉर्पोरेट क्रिकेटसाठी खेळला. मंगळवारी (२० नोव्हेंबर) तो पुढच्या प्रवासाला निघाला असून, तेथे कस्टम क्रिकेट संघासोबत खेळत आहे. आगामी वर्षात ‘रणजी’चे स्वप्न साकार करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत जाण्याचा मानस शुभम शर्माने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

गुन्हेगारीत अव्वल असलेल्या भुसावळ येथील दोन खोल्यांच्या घरात वास्तव्य. कुटुंबात आई निर्मला, दिव्यांग बहीण. वडील घनश्‍याम शर्मा व्यावसायिकाकडे मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अगदी छोटेखानी मजूर कुटुंबातून आलेल्या शुभम शर्माला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड.

असा झाला प्रवास... 
शाळेत व नंतर नाहाटा महाविद्यालयाकडून अनेक स्पर्धा गाजविल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात कामगिरी बजावण्याची संधी त्यास मिळाली.. तेथून कॉर्पोरेट क्रिकेट लीगमध्ये निवड झाल्यावर हैदराबादच्या मसाला उत्पादक कंपनीच्या संघात तो खेळत असून, गेल्या आठवड्यात दिल्लीच्या जामिया युनिव्हर्सिटीच्या मैदानात खेळला. या सामन्यात दिल्ली, कानपूर, मुंबई, राजस्थानसह हैदराबादच्या व्यावसायिक खेळाडूंसोबत खेळण्याची संधी त्याला मिळाली. बुधवारी (२१ नोव्हेंबर) मुंबईत आयोजित सामन्यांसाठी शुभम पोचला असून, तेथे तो बंगालच्या संघात खेळणार आहे. शुभम खेळत असलेल्या कॉर्पोरेट लीग स्पर्धांचे प्रक्षेपण एका खासगी वाहिनीवरून झाले, त्याला त्याच्या नातलगांसह मित्रपरिवाराने मोठा प्रतिसादही दिला. 

‘रणजी’चा निर्धार 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूदेखील आता कॉर्पोरेट क्रिकेटलाच पसंती देत असल्याने या स्पर्धांतून खेळाडूंना भविष्याची आशा लागून असते. खेळत असताना दुखापत झाल्याने ठरवलेले लक्ष्य गाठता आले नाही. मात्र, आगामी वर्षात ‘रणजी’पर्यंत मजल गाठण्याची अपेक्षा आहे. परिश्रम सुरू आहेत, लक्ष्य गाठूच, असा विश्‍वास शुभमने ‘सकाळ’शी बोलताना केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT