Laling fort draped in green shawls in Shravan and welcoming tourists through the tricolor gate. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : लळींग किल्ला पर्यटकांना खुणावतोय

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : धुळे शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर आणि मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या लगतच पश्चिमेला लळींग कुरण विस्तीर्ण पसरलेले आहे. येथील किल्ला तर प्रवाशांना इतिहासाची साक्ष देत खुणावत असतो.

सध्या होत असलेल्या पावसाने किल्ल्याने हिरवी शाल पांघरली आहे. तर लळींग कुरण हिरवाईने नटलेला आहे. कोसळते धबधबे आणि वन्यजीव बघण्यासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत. (Laling fort is attracting tourists in shravan Dhule Latest Marathi News)

पर्यटन स्थळांना हवा मॉडर्न लुक

मुंबई आग्रा महामार्गावरील आणि धुळे शहरापासून आठ किमी अंतरावर लळिंग किल्ल्यावरील बंधारे बांधून धबधबेही बाराही महिने प्रवाहित करता येतील. प्राण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात कुरणातीलच प्राणी पाण्यासाठी इतरत्र भटकताना आढळतात.

पर्यटनाच्या दृष्टीने याठिकाणी बऱ्याच गोष्टी करणे शक्य आहे. विकासासाठी आलेल्या निधीचा वापर कल्पकतेने केल्यास याठिकाणी इतर जिल्ह्यातील पर्यटक भेट देतील. पर्यटन स्थळांना मॉडर्न लुक देणे आवश्यक असल्याचे येथील भेट देणारे पर्यटक सांगतात.

निधीची आवश्यकता

सोनगीर किल्ल्यासाठीच्या लाखोचा निधी खर्च करुनही तिकडे कुणी चुकूनही जायला तयार नाही. थाळनेर व भामेर किल्ल्यांची दयनीय अवस्था आहे. मळी हे पर्यटन स्थळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यासह गुजरातमधीलही पर्यटक येतील. एवढे चित्तवेधक आहे. पण तिकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुविधांची स्थिती पर्यटनाला अनुकूल नाही.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर होतेय गर्दी

धुळ्यात पर्यटन स्थळांवर विशेष सुविधा नसली तरी पर्यटक भेटी देतात. त्यात लळींग किल्ला, लळींग कुरण, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर (धुळे), राजवाडे संशोधन मंदिर, समर्थ वाग्देवता मंदिर, सोनगीरचा किल्ला (धुळे), कन्हयालाल महाराज मंदिर आमळी , भामेरचा भूईकोट किल्ला (ता.साक्री), प्रती तिरुपती बालाजी मंदिर शिरपूर, धरणे व लहान मोठे बंधारे शिरपूर तालुका, बिजासनदेवी, नागेश्वर, थाळनेरचा, प्रती पंढरपूर बाळदे (शिरपूर तालुका), पेडकाई माता मंदिर. या सर्वच पर्यटन स्थळांनी हिरवी शाल पांघरली असून, पर्यटकांना खुणावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

Panchang 11 January 2026: आजच्या दिवशी सूर्यकवच स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

900 दरवाजे आणि 800 खिडक्या, आजपासून बिग बॉस घरात स्पर्धकांचा खेळ रंगणार, पंख असलेली कुलूप, लपलेल्या चाव्या आणि बरच काही

Youth Killed Accident : धक्कादायक! कोल्हापूरचे चार तरूण रत्नागिरीला फिरायला गेले अन्,झाला भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

SCROLL FOR NEXT