A mechanism for making corn meal.
A mechanism for making corn meal.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : स्वावलंबनाचा लामकानी शेतकरी पॅटर्न; गटशेतीचा लाभ

खेमचंद पाकळे

लामकानी (जि. धुळे) : येथील शेतकऱ्यांच्या गटशेतीचे लामकानी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिडेटमध्ये रूपांतर झाले आहे. यात शाश्वत शेतीसोबत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो आहे. त्यातून लामकानीत आर्थिक स्वावलंबनाचा शेतकरी पॅटर्न विकसित झाला आहे. ग्रीन हीरो व धुळे शहरातील नामांकित डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाने ही किमया साधली गेली आहे. (Lamkani farmer pattern of self reliance Benefits of group farming Dhule News)

गाठी.

डॉ. नेवाडकर यांनी दुष्काळाला तोंड देण्याऱ्या लामकानी (ता. धुळे) गावात २२ वर्षांपूर्वी लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकास व कुरण विकासाची चळवळ सुरू केली. अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे झालेल्या वॉटर कप स्पर्धेत लामकानीने दिवसरात्र मेहनत करीत प्रथम क्रमांक पटकावला.

यातून जलपातळी वाढली खरी, परंतु बदलते ऋतुचक्र, पिकांच्या भाववाढीतील चढउतार, आवश्‍यक मनुष्यबळ, वाढलेले तण यातून शेतकऱ्यांना दिलासा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी लोकसहभागातून पुढे डॉ. नेवाडकर यांनी २०१९ मध्ये जय गजानन पशुपालक मंडळ या नावाने आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी गटाची स्थापना केली.

प्रक्रिया उद्योग सुरू

शेतकरी गटाची सुरवातीला ७१ सदस्यसंख्या होती. त्यास प्रोत्साहन व सबलीकरण योजनेतून ‘मुरघास व सुगंधी तेलनिर्मिती’साठी अनुदान मिळाले. कोविड काळात अनेक अडचणींवर मात करत गटाने ६० लाख रुपयांचा व्यवहार केला.

तसेच ५० शेतकऱ्यांनी मक्यापासून एक हजार टन मुरघासाची विक्री करून यशस्वी वाटचाल सुरू केली. पुढे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या स्मार्ट योजनेत सहभाग घेऊन शेतकरी गटाने हळद व सुगंधी वनस्पती प्रक्रिया उद्योग सुरू केला.

कृषी विभागाच्या सहकार्याने प्रकल्पाची व्याप्ती वाढवत गटशेतीचे १२ एप्रिल २०२१ ला ‘लामकानी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमटेड’मध्ये रूपांतर झाले. त्यात आजमितीस तीनशेपेक्षा जास्त शेतकरी सदस्य आहेत.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

साडेपाच लाखांची तेल विक्री

शेतकरी गटाकडून ‘स्मार्ट’अंतर्गत सुगंधी व औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाला असून, हळद पावडर व सुगंधी वनस्पती तेलनिर्मिती केली जात आहे. ती ऊर्ध्वपातन व अर्क अशा दोन पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे.

यासाठी पारंपरिक पीकपद्धतीपेक्षा मसाले पिके, हळद, आले आणि सुगंधी वनस्पती म्हणून जिरेनियम, लेमनग्रास, पाल्मारोजा, वाळा, गुलाब, मोगरा तसेच औषधी वनस्पती म्हणून तुळशी, कांदा बी, अश्वगंधा, तरोटा, रान तुळस आदी पिके घेण्यावर भर आहे. सुगंधी तेलनिर्मितीसाठी शेतकऱ्यांनी दहा एकर जिरेनियम लागवड करून साडेपाच लाख रुपयांचे तेल विक्री केले आहे.

निरनिराळी उत्पादने अन्‌ पुरवठा

येथील सुगंधी तेलाचा मुलुंडमधील (मुंबई) केळकर सुगंधी तेल कंपनीला पुरवठा केला जातो. तसेच मुंबई येथील म्हशीपालन करणाऱ्या तबेल्यांना व गुजरातमधील गोशाळेला मुरघास विक्री केला जातो. शेतकरी गट बँक कर्जाची नियमित परतफेड करतो.

उत्पन्नवाढीसाठी तेलनिर्मितीनंतर उर्वरित बायोमासपासून तसेच इतर कापूस काड्या, भुईमूग टरफले, मका कणीस, बाजरी कणग्या आदी पीक अवशेषांपासून पांढरा कोळसा किंवा बायो कोल बनविणे, सुगंधी तेलनिर्मितीनंतर उरलेल्या जिरेनियम, विविध फुलांच्या अवशेषापासून रसायनमुक्त नैसर्गिक अगरबत्ती, धुपबत्ती, गुलाबजल निर्मिती केली जात आहे. यात लवकरच वीजखर्च बचतीसाठी ६० किलोवॉटचे सोलार पॅनल बसविले जाणार आहेत.

"लामकानीत लोकसहभागातून पाण्याचा प्रश्न मिटविला; परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक व शाश्वत विकासासाठी गटशेतीमार्फत नियोजन, शासकीय योजनेच्या लाभातून प्रक्रिया उद्योग उभारला. त्यामुळे त्यांच्या प्रगतीची कवाडे खुली झाली आहेत."

-डॉ. धनंजय नेवाडकर, लामकानी पॅटर्नचे शिल्पकारर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT