district collector Jalaj sharma receiving rover machine esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : भूमी अभिलेख कार्यालय; 5 रोव्हर्स मशीन प्रदान

निखील सुर्यवंशी

धुळे : जिल्हा वार्षिक योजनेतून भूमी अभिलेख कार्यालयास (Land Records Office) पाच रोव्हर्स मशीन, दोन इटीएस मशीन, पाच संगणक आणि पाच प्रिंटर प्राप्त झाले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते रोव्हर्सचे (Rover Machines) वितरण करण्यात आले, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर यांनी दिली. (Land Records Office get 5 rovers machines Dhule News)

जिल्हाधिकारी शर्मा यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला. भूमी अभिलेख विभागातर्फे मोजणीच्या कामांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी भर दिला जात आहे. हे काम अधिक अचूक आणि उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी शर्मा यांच्या पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ६२ लाख २३ हजार ६४५ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून ही यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे.

याबाबत भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण देण्यात आले होते. उपअधीक्षक किरणकुमार पाटील (धुळे), गोविंद भाबड (शिरपूर), डी. आर. वाघ (शिंदखेडा) आदी उपस्थित होते. भूमी अभिलेख विभागाला अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने मोजणीच्या कामांना गती द्यावी, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. श्री. बिलोलीकर यांनी रोव्हर्स यंत्राची माहिती दिली.

अशी आहे रोव्हर्स यंत्रणा

रोव्हर्सद्वारे प्रत्येक जागेला अक्षांश- रेखांशावर अचूक मोजमाप करून नोंदविता येते. उपग्रहाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आता हे मोजमाप करून जमिनीचा नकाशा तयार करता येतो. जीपीएस प्रणालीने हे मोजमाप अधिक विस्तारित केले असून, रोव्हर्सद्वारे मोजमाप हा जीपीएस प्रणालीतील पुढचा टप्पा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT