Soldiers of 169 Artillery Regiment paying their respects to martyr Manoj Mali on Sunday. esak
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: शहीद मनोज माळी यांना अखेरचा निरोप; वाघाडीकरांना शोक अनावर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ‘वीर जवान अमर रहे...’ ‘जब तक चांद-सूरज रहेगा, वीर मनोज का नाम रहेगा...’ अशा गगनभेदी घोषणा देत हजारो शिरपूरकरांनी शहीद लान्सनायक मनोज संजय माळी (वय २५) याला रविवारी (ता. ९) सकाळी अखेरचा निरोप दिला.

भुरभुरणाऱ्या पावसाचे पाणी कपड्यांवर, तर तालुक्याच्या वीर सुपुत्राला अंतिम निरोप देताना आलेले अश्रू डोळ्यात, अशी वाघाडी (ता. शिरपूर) येथील मैदानावरील परिस्थिती होती. पुतण्या यश याने चितेला मुखाग्नी देताच वातावरण नि:शब्द झाले. (Last Farewell to Martyr Manoj Mali Condolences to Wagadikars Dhule News)

अखेरचा निरोप देण्यासाठी तिरंगा घेऊन जाताना मनोजचे कुटुंब. शेजारी जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभाकर चव्हाण

वाघाडी येथील रहिवासी व सैन्यदलात लान्सनायक असलेले मनोज माळी यांचे सिक्कीम येथे ६ जुलैला पहाटे कर्तव्यावर असताना पाय घसरून दरीत कोसळल्याने निधन झाले होते.

त्यांचा मृतदेह गंगटोक, नवी दिल्ली व तेथून छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आणण्यात आला. संभाजीनगर येथे त्याच्या पार्थिवाला सैन्यातर्फे मानवंदना देण्यात आली. रविवारी पहाटे तेथून पार्थिव विशेष वाहनाद्वारे शिरपूरला आणण्यात आले.

नागरिकांची मानवंदना

शहरातील करवंद नाका येथे पार्थिव आल्यानंतर शवपेटिका हारांनी सजविलेल्या वाहनात ठेवण्यात आली.

सहकारी जवान शवपेटीसोबत होते. देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद, वाहनासोबत पायी दौड करणारे युवक, माजी सैनिक आणि तिरंगा फडकावत पुढे धावणारी वाहने अशी अंत्ययात्रा शिरपूरपासून वाघाडीला नेण्यात आली.

अंत्ययात्रेदरम्यान रस्त्यावर मनोजचे अंत्यदर्शन घेऊन मानवंदना देण्यासाठी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यांवर, चौकात अंत्ययात्रेची वाट पाहत थांबून होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

...आणि बांध फुटला

वाघाडी येथील माळी गल्लीत मनोजचे घर आहे. ६ जुलैला त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी संयम दाखवला. मात्र रविवारी मुलाचे कलेवर पाहिल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

‘मनोज, मध्येच सोडून गेलास रे...’ म्हणत त्यांनी एकच आकांत केला. तो पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर अंत्ययात्रा वाघाडी-बोराडी रस्त्यावरील मैदानावर नेण्यात आली.

मैदानावर तयार केलेल्या चौथऱ्यावरर मनोज यांचे पार्थिव ठेवण्यात आले. मनोजची आई, वडील आणि भाऊ यांनी घडी केलेला तिरंगा हाती घेऊन त्याला अखेरचा निरोप दिला. १६९ आर्टिलरी रेजिमेंटचे जवान आणि महाराष्ट्र पोलिस यांनी फैरी झाडून मानवंदना दिली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार काशीराम पावरा, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, निशांत रंधे, रोहित रंधे, भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, सरपंच किशोर माळी आदींसह लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT