crime  news
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : एलसीबीने जुगार उधळला; 10 जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील चाळीसगाव चौफुलीजवळील एका हॉटेल लॉजिंगमधील बंद खोलीत रंगलेला जुगार एलसीबीने छापा टाकत उधळला.

पोलिसांनी दहा संशयितांना ताब्यात घेतले, मात्र हॉटेलचालक फरारी झाला. संशयितांकडून कार, दुचाकीसह सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.(LCB arrested 10 people for gambling dhule crime news)

धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीजवळील हॉटेल कुणाल श्रीकृष्ण लॉजिंग येथे एका बंद खोलीत हॉटेलचालक गणेश शिंगाडे त्याच्या देखरेखीखाली ५२ पत्त्यांच्या कॅटवर स्वतःच्या फायद्यासाठी जुगाराचा खेळ खेळत व खेळवत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ३) मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथे जुगार खेळताना दहा जण मिळून आले. हॉटेलचालक गणेश शिंगाडे पसार झाला. तेथून पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख ८५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी गणेश शिंगाडे (फरारी) याच्यासह हरीश चौधरी, मनोज पाटील, राहुल पाटील, भरत कोकणे, शिवाजी पाटील (रा. मोहाडी), अमोल बाविस्कर, राहुल कोरके, कुणाल गवळी (रा. पवननगर, चाळीसगाव रोड, पश्चिम हुडको, धुळे), आनंदा वाल्हे (रा. अवधान), रवी जिवरक (रा. शासकीय डेअरीजवळ, मिल परिसर, धुळे) यांच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंतराव पाटील, सुशील शेंडे, नीलेश पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT