Leopard
Leopard 
उत्तर महाराष्ट्र

मेहुणबारे परिसरात बिबट्याचा पशुसंहार सुरूच 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (धुळे) : गिरणा परिसरात बिबट्याकडुन गुरांवर होणारे हल्ले सुरूच आहेत. येथील गिरणा नदीच्या पलीकडील शिवारात दोन दिवसात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी होत असून मागच्यावेळी पिंजऱ्यांवर बसलेल्या बिबट्यावर बॅटरी चमकल्याने तो पळुन गेला. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. 

उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील जगन्नाथ गायकवाड यांचे शेत मेहुणबारे शिवारात आहे. मंगळवारी (ता. 2) गायकवाड यांनी आपली गुरे शेतात बांधली व ते उंबरखेडला घराकडे निघुन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात आले असता त्यांच्या  दोन वर्षाच्या गोऱ्हाचा बिबट्याने फडशा पाडल्याचे अढळुन आले. सुरवातीला हा हल्ला हिंस्त्र प्राण्याने केल्याचा त्यांचा अंदाज होता. मात्र या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसुन आल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना समजताच त्यांनी वनपाल प्रकाश देवरे वनरक्षक अजय महीरे,बाळु शितोळे यांना घटनास्थळी पाठविले. ही घटना ताजी असतानाच याच भागात संजय अहिरे यांच्या शेतात देखील बिबट्याने हल्ला करून आठ महिन्याच्या वासराला ठार केल्याचे अढळुन आले.जवळच्या रहीपुरी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत तोच मेहुणबारे भागात दोन गुरांवर हल्ले झाल्याच्या घटनेने शेतकर्यामध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दोन महिन्यांपासून हल्ले 
या भागात बिबट्याने सुमारे  दोन महीन्यापासुन दहशत निर्माण केली आहे. वडगाव लांबे, रहीपुरी, मेहुणबारे, बहाळ, वाडे,आदी परिसरात पशुसंहार करण्याऱ्या बिबट्याची भीती दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या कपाशी वेचणीचे कामे आता सुरू झाली आहेत. मात्र बिबट्यच्या दहशतीखाली असलेला गिरणा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याने आजपर्यंत एकही मानवी हल्ला केला नसला तरी भविष्यात मोठी घटना घडु शकते त्यामुळे वनविभागाने हा बिबट नरभक्षक होण्याआधी जेरबंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाच ठिकाणी लावले पिंजरे
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सध्या पिलखोड, मेहुणबारे, बहाळ, रहीपुरी वडगाव लांबे आशा पाच  ठीकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंजर्‍यात बिबट्या हा वडगावला कधीच कैद झाला असता, केवळ काही ग्रामस्थांच्या चुकीमुळे बिबट्या निसटला व तो अजुनही सापडला नाही. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

शेतात कापूस वेचणी कीवा शेती काम करतांना एकटे न राहता समुहाने करावे. शेतशिवारात लहान पशुधन शेतात ठेवु नये. बिबट्या हा लहान वासरांवरच हल्ले करत आहे. त्यामुळे गुरे ही गावातच बांधावेत
- संजय मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT