Leopard
Leopard 
उत्तर महाराष्ट्र

पळसोद, रामेश्‍वर परिसरात बिबट्याची दहशत

संतोष पाटील

भोकर (ता. जळगाव) - येथून जवळच असलेल्या पळसोद, रामेश्‍वर शिवारात मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून ठार केल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन अधिकाऱ्यांनीही भेट देऊन परिसरात बिबट्या असल्याचा दुजोरा दिला आहे.

पळसोद-रामेश्‍वर रस्त्यावरील गट क्रमांक १५७ हिरामण मंगल सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायीचा मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान बिबट्याने फडशा पाडला. सालगडी म्हणून कामाला असलेला धोंडू नाईक हा शेतात वास्तव्यास होता. सकाळी त्याला गोठ्यात गाय ही मृतावस्थेत आढळून आली. नाईक याने मालक हिरामण मंगल सोनवणे यांना गाय ही मृत असल्याची माहिती दिली. हिरामण सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वाघ असल्याची माहिती ‘सकाळ’शी बोलताना दिली व मृत झालेल्या गायीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. वनविभागाचे बीट वनरक्षक अश्विनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या असल्याचे सांगितले. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पळसोद व रामेश्वर परिसर हा तापी गिरणा नदीच्या संगमावर आहे. याठिकाणी उंच-सखल भाग व घनदाट झाडेझुडपी आहेत. तर जामोद, पळसोद, आमोदा, देवगाव, भोकर, गाढोदा, येथे केळी, ऊसाची लागवड अधिक असल्याने बिबट्याचा वावर आहे. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT