BJP
BJP 
उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : दिंडोरीत भाजपच्या उमेदवारीचा गुंता सुटेना

सकाळवृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत - दिंडोरी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना उमेदवारीसाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. यासाठी चव्हाण यांची स्वारी शिष्टमंडळासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दारी सोमवारी गेल्याचे समजते. महाजन यांनी त्यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने भाजपचा उमेदवार चव्हाण की डॉ. भारती पवार, हे गूढ कायम आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांना पक्षाने उमेदवारी डावलल्याने त्या भाजपचे दार ठोठावत आहेत. युतीच्या मेळाव्यात त्यांचा प्रवेश ऐनवेळी स्थगित करण्यात आला. त्यामुळे खासदार चव्हाण यांना उमेदवारीसाठी बळकटी मिळाली होती. ज्येष्ठ नेते नितीन गडकरींमार्फत प्रयत्न केले. भाजपने अजून नकराघंटा वाजविलेली नसल्याने डॉ. पवार यांचे उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. पवार यांना हिरवा कंदील दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उमेदवारीची शर्यत अद्याप संपलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT