ShivSena
ShivSena 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शिवसेना- भाजप युतीत जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या युतीत शिवसेनेने लोकसभेत भाजपला भक्कम साथ देत त्यांच्या उमेदवारांना खासदार केले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली असून, युती झाल्यास या मतदारसंघावर हक्क सांगण्यात येणार आहे. मुंबई येथे उद्या (ता. २८) शिवसेना खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. बैठकीत न लढविलेल्या जागांबाबत चर्चा होणार असून, यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिवसेना-भाजप युती झाल्यापासून युतीत दोन्ही मतदारसंघ भाजपकडेच आहेत. मोठ्या मताधिक्‍याने दोन्ही जागा निवडून येत आहेत. त्यात शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा सहभाग असतो. मात्र, यावेळी प्रथमच शिवसेनेने एका लोकसभेच्या जागेची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत असून, त्यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षातर्फेही त्यांच्या नावाला हिरवा कंदील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विद्यमान खासदार भाजपचे असल्यामुळे युती झाल्यास ही जागा भाजपकडेच राहण्याची शक्‍यता आहे.

मात्र, युती झाली तरीही ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यासाठी या अगोदर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन जागांपैकी एक जागा शिवसेनेने लढविलीच पाहिजे, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व जळगाव शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यासोबत अमळनेर व चाळीसगाव तालुक्‍यातही काही प्रमाणात बळ आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होईल. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येऊ शकतो, असा विश्‍वासही पदाधिकाऱ्यांना आहे. या मतदार संघात शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवार आर. ओ. पाटील यांनी जनसंपर्कही सुरू केला आहे. युती नाही झाली तर ते पक्षाचे उमेदवार असतील; परंतु युती झाली तरीही ही जागा शिवसेनेनेच लढवावी, असा आग्रही होत आहे.

बैठकीकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्या (ता. २८) मुंबईत शिवसेनेचे राज्यातील खासदार व पदाधिकारी यांची बैठक होत आहे. २०१४ मध्ये पक्षातर्फे लढविण्यात आलेल्या जागांबाबत चर्चा होणार आहे. त्याशिवाय आतापर्यंत न लढविलेल्या जागांबाबतही विचार करण्यात येणार आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचीही जागा असून, त्या ठिकाणी उमेदवाराची तयारी असल्याने ती जागा शिवसेनेतर्फेच लढविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव लोकसभा मतदार संघ लढविण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. युती झाली तरी ही जागा शिवसेनाच लढविणार आहे. त्यासाठी आम्ही शंभर टक्के तयारी केली आहे.
- संजय सावंत, संपर्कप्रमुख, शिवसेना जळगाव लोकसभा क्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT