police long march.jpg 
उत्तर महाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीडशे पोलीसांचा लॉंगमार्च 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नाशिक पश्चिम मतदार संघात पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला. सिडको व परिसरामधील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे लॉंग मार्च काढण्यात आला. त्याची सुरूवात अंबड पोलीस ठाण्यातून होऊन विजयनगर, उत्तमनगर, राजरत्ननगर, पवननगर, सावतानगर, दिव्या ऍडलॅबमार्गे त्रिमूर्ती चौक या परिसरात सुमारे १५० पोलीस कर्मचार्‍यांनी लॉंग मार्च काढून नागरिकांना भयमुक्त राहण्याचे आवाहन केले.

लॉंगमार्च पाहून काही वेळासाठी नागरिक अचंबित

यावेळी भर वस्तीत रहदारीचा परिसर असलेला पवननगर भाजी मार्केटजवळ पोलिसांचा ताफा बघताच नागरिकांना काही अनुचित प्रकार घडला का, असे वाटले होते. मात्र पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आल्यानंतर हा लॉंगमार्च आपल्याच सुरक्षेसाठी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक उपायुक्त समीर शेख, अंबड पोलीस ठाण्याचे व.पो.नि. श्रीपाद परोपकारी, सहाय्यक निरीक्षक संजय बेडवाल आदींसह सीआयएसएफ, क्यूआरटी, आरसीपी, होमगार्ड व अंबड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी लॉंग मार्चमध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT