Kishor-Patil 
उत्तर महाराष्ट्र

पाचोरा : आमदार किशोर पाटील ‘रिपीट’ : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किशोर पाटील यांना मतदारांनी प्रथम पसंती देऊन पुन्हा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी ‘रिपीट’ केले. त्यांचा २ हजार ८४ मतांनी निसटता विजय झाला. या मतदारसंघात ६३.६२ टक्के मतदान झाले होते. ३ लाख १३ हजार ४४६ पैकी १ लाख ९९ हजार ४१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 
मोंढाळा रस्त्यावरील गिरणाई पतसंस्थेच्या गोदाम क्रमांक ३ मध्ये मतमोजणी करण्यात आली. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरवात झाली. मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले होते. १३ फेऱ्यांमध्ये मोजणी झाली. प्रत्येक टेबलवर शिपायासह ४ कर्मचाऱ्यांकडून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात आली. सुरुवातीला एक तासानंतर पहिली फेरी जाहीर झाली. मोजणी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालली. साडेचारपर्यंत देखील अंतिम निकालाची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेली नव्हती. ११ व्या फेरीची मतमोजणी सुरू असताना ९४ क्रमांकाच्या केंद्रावरील ‘इव्हीएम’ मशीनच्या डिस्प्लेवर आकडेवारी दिसत नसल्याने ते मशीन बाजूला करून त्या टेबलावरील मतमोजणी तहकूब करण्यात आली. त्यामुळे थोडा विलंब झाला. पहिल्या फेरीपासून अमोल शिंदे यांनी घेतलेली आघाडी १० व्या फेरीपर्यंत कायम राहिली. १ ते १० पर्यंतच्या मोजणीच्या फेऱ्या या भडगाव शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांवरील होत्या. यात अमोल शिंदे यांना सुमारे २ हजार पर्यंतचे मताधिक्य मिळाले. यातून त्यांनी शिवसेनेचा गड पोखरण्याचे सिद्ध झाले. ११ व्या फेरीत आमदार किशोर पाटील यांना १६२ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी २३ व्या फेरीपर्यंत कमीजास्त प्रमाणात कायम राहिली. प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत होणारी चढउतार साऱ्यांचीच धडकी वाढवणारी होती. २२ वी फेरी संपली त्यावेळी आमदार किशोर पाटील हे ३ हजार ५५६ मतांनी आघाडीवर होते. २३ वी शेवटची फेरी सुरू करण्याअगोदर टपाली व सैनिकांची मते मोजण्यात आली. त्यासाठी सुमारे अडीच तासांचा अवधी लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्डे अपघातात जीव गमावलेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांचं महापौरांनी केलं सांत्वन

Pachod News : नांदरमध्ये २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली; परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT