Incomplete Road Construction esakal
उत्तर महाराष्ट्र

शहरातील रस्ते कामांमुळे वैताग; मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत

रमाकांत घोडराज

धुळे : शहरातील विविध भागात, हद्दवाढ क्षेत्रात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत (Bad Road Condition) नागरिकांच्या तक्रारी आहेत. यात देवपूर भागातील नागरिकांची ‘कथा’ मात्र वेगळीच आहे. या भागात कोट्यवधींची भुयारी गटार योजना (Underground sewer scheme) आली, कोट्यवधींचे रस्ते मंजूर झाले, मात्र ही कामेच देवपूरवासीयांसाठी वैताग आणणारी ठरली आहेत. आता पावसाळा तोंडावर असतानाही विशेषतः मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. पाऊस पडल्यानंतर या कामांचे काय होईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कशा असतील, याची कल्पनाच केलेली बरी. (Main road works are incomplete Dhule News)

शहराच्या देवपूर भागात तब्बल १५५.९७ कोटी रुपये खर्चाची भुयारी गटार योजना मार्च २०१९ मध्ये मंजूर झाली. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे काम रखडले. मात्र, कोरोनाचे संकट गेल्यानंतरही योजनेचे भाग्य उजळलेले नाही. योजनेचे काम आजघडीला बंद आहे. तक्रारी, आंदोलने, पाठपुराव्यानंतर रस्ते दुरुस्तीचे थातूरमातूर काम झाले खरे, मात्र मुख्य रस्त्यांची कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नाहीत.

नागरिकांची कसरत सुरू

देवपूर भागातील वाडीभोकर रोड, नकाणे रोड हे प्रमुख रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, विविध कारणांनी ही कामे रखडली. आता काम सुरू असले तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे कामे सुरू झाल्यानंतरही नागरिकांची कसरत संपलेली नाही. कुठे पाइपलाइनचे काम, कुठे भुयारी गटाराचे काम, कुठे नाल्यावरील पुलाचे काम आदी कामांसाठी मोठमोठे खड्डे, रस्त्यावर खडी, मातीचे ढीग आहेत. कामे लवकर होत नाहीत, त्यामुळे हे अडथळे अनेक दिवस तसेच असतात. त्यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. अनेक वाहनधारकांना रस्ता ब्लॉक असल्याचे माहीत नसते त्यामुळे ते ब्लॉक असलेल्या ठिकाणापर्यंत पोचतात आणि नाइलाजास्तव पुन्हा मागे फिरतात. शिवाय वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो.

कामे कधी पूर्ण होतील?

रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होतील, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. संथगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसाळा येईल, असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे. आता तोंडावर पावसाळा असताना रस्त्यांवरचे हे मोठमोठे खड्डे व इतर अडथळे कधी दूर होतील हा प्रश्‍नच आहे.

लोकप्रतिनिधी फुसके; यंत्रणा ठरल्या वरचढ

संबंधित यंत्रणांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही, असेच आजपर्यंत पाहायला मिळाले आहे. लोकप्रतिनिधीही तक्रारी झाल्यानंतर कामांची पाहणी करतात, बैठका घेतात, अधिकाऱ्यांना सूचना देतात, इशारे देतात आणि मोकळे होतात. प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधित यंत्रणा आपल्या ढिम्म स्टाइलनेच काम करत राहतात. लोकप्रतिनिधींनाही त्या जुमानत नाहीत, असेच यातून दिसते. अन्यथा ही कामे कधीच पूर्ण झाली असती. अर्थात धुळेकर नागरिकांमध्येही प्रचंड सहनशक्ती आहे. त्यामुळे कदाचित यंदाचा पावसाळाही ते कसरतीतच काढून घेतील, असे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

SCROLL FOR NEXT