While announcing the reservation of ward-wise Gram Panchayat elections in the Mahatma Jotiba Phule auditorium, S. T. kuvar, esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मालपूर ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर; विशेष ग्रामसभा

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले. सहा प्रभागांत १७ जणांसाठी चक्रानुसार आरक्षण जाहीर झाल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी अकराला महात्मा जोतिबा फुले सभागृहात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. प्राधिकृत अधिकारी दोंडाईचा मंडळाधिकारी एस. टी. कुवर यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण जाहीर केले. (Malpur Gram Panchayat Election Reservation Announced dhule news)

सरपंच मच्छिंद्र शिंदे, तलाठी माझडकर, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, लक्ष्मण पानपाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, जगदीश पाटील, तुकाराम माळी, कैलास माळी, तुकाराम पाटील, सुभाष ठाकरे.

सुनील कोळी, देवमन भिल, अॅड. पंकज पाटोळे, जयवंत पाटील, भटू रावल, श्रीराम अहिरे, लोटून इंदवे, सुरेश इंदवे, प्रशांत अडगाळे, वीरेंद्र पवार, राहुल गोसावी, पंकज वाघ, रवींद्र बागूल, हेमंत खंडेराय, रवींद्र राजपूत, कुलदीप अडगाळे, दीपक वसईकर आदी उपस्थित होते.

आगामी होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण फिरते असल्याने अनेक महत्त्वाकांक्षी संभाव्य उमेदवारांची कोंडी झाली आहे. मतदारांचे जातीय समीकरण जुळत नसल्याने उमेदवारांची आयात-निर्यात काही प्रभांत होणार असल्याची शक्यता आहे.

काही हौशी स्वयंघोषित उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली आहे. ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी आरक्षणापूर्वीच संभाव्य उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे.

१३ फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले जाईल. त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येतील. २१ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी हरकती विचारात घेऊन २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती श्री. माझडकर यांनी दिली.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग एक ः ३ जागा- अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती स्त्री एक, सर्वसाधारण स्त्री एक.

प्रभाग दोन ः ३ जागा- नामाप्र स्त्री एक, सर्वसाधारण स्त्री एक, सर्वसाधारण एक.

प्रभाग तीन ः २ जागा- अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती स्त्री एक.

प्रभाग चार ः ३ जागा- नामाप्र एक, सर्वसाधारण स्त्री एक, सर्वसाधारण एक.

प्रभाग पाच ः ३ जागा- अनुसूचित जाती स्त्री एक, नामाप्र स्त्री एक, सर्वसाधारण एक.

प्रभाग सहा ः ३ जागा- अनुसूचित जाती एक, नामाप्र एक, सर्वसाधारण स्त्री एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT