girl harrasment  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : नकाणे तलाव परिसरात विद्यार्थिनीवर अत्याचार; वाढदिवसाची बतावणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरातील नकाणे तलाव येथे नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी संशयित तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (man sexually assaulted college girl luring her to marry him dhule crime news)

साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील आसाराम नगर आहे. तेथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोशन प्रकाश सोनवणे (वय २१, रा. जोरावली सोसायटी, साक्री रोड, धुळे) याने पिडितेला साक्री रोडवरील महाविद्यालयात मिठी मारली.

तसेच तिला नकाणे तलाव येथे वाढदिवसाची बतावणी करत तो साजरा करण्यासाठी सोबत नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला ठार मारण्यासह स्वतःही मरण्याची धमकी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतरही वारंवार नकाणे तलाव येथे नेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार जुलै २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी संशयित सोनवणे याच्यावर विविध कलमांसह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT