Surabhi more esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News: ताम्हिणी घाटातील अपघातात मंदाणे येथील तरुणीचा मृत्यू; 5 दिवसांपूर्वी कंपनीत झाली होती रुजू

अपघाताची घटना मंदाणे गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावावर शोककळा पसरली.

सकाळ वृत्तसेवा

मंदाणे : ताम्हिणी घाटात (ता. मालगाव) झालेल्या अपघातात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (वय २२) व कांचन मारुती पाटील (२०, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) या दोघांचा मृत्यू झाला. (Mandane girl dies in Tamhini ghat accident Joined company 5 days ago Nandurbar Accident News)

पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले.

जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे. मंदाणे येथील सुरभी मोरे, लक्ष्मी मोरे यांनी या २० डिसेंबरला पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मुलाखत दिली होती.

त्यात त्यांची निवड होऊन ते २४ डिसेंबरला त्या कंपनीत रुजू झाले. त्यानंतर पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्यासह मंदाणे येथील तरुण धीरज कुवर हा त्या कंपनीत आधीपासून रुजू होता.

तोदेखील या सहलीत सहभागी होता. सुरभी व लक्ष्मी या दोघींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे त्या कंपनीची सहल निघाली होती.

सहलीच्या स्थळापर्यंत पोचण्याआधीच शनिवारी अवघ्या तीन तासांच्या प्रवासानंतर ताम्हिणी घाटात बसचा अपघात झाला. अपघाताची घटना मंदाणे गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावावर शोककळा पसरली.

विवाहापूर्वीच मृत्यूने गाठले

मृत सुरभी मोरे हिच्यासाठी चांगले स्थळ मिळाले होते. सहलीहून परतल्यावर मंदाणे गावी ती आल्यावर विवाह निश्चित करण्यात येणार होता. त्या अगोदरच क्रूर काळाने झडप घालून सुरभीला हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence News : कोल्हापुरात फलक व झेंड्यावरून दोन गटांत तुफान राडा, हत्यारे, दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ

रोहित शर्मा, विराट कोहली यांचे पुढे काय? BCCI म्हणते, आमचे धोरण स्पष्ट आहे, त्यांचा निर्णय...

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

कारने LPG टँकरला धडक देताच उडाला आगीचा भडका, ५० पेक्षा जास्त जण होरपळले

Supreme Court: सर्व निकाल रद्द! निवृत्त न्यायमूर्तींच्या निर्णयांवर सर्वोच्च कोर्टाचा मोठा आदेश, सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT