railway
railway 
उत्तर महाराष्ट्र

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मनमाड कुर्ला एक्सप्रेस रद्द

सकाळवृत्तसेवा

लासलगाव : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 7 डबे आसनगाव येथे घसरल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, मनमाड कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस आज (मंगळवार) रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे खूप हाल झाले.

मनमाड, लासलगाव येथील चाकरमान्यांनी नाशिककडे जाण्यासाठी बसचा पर्याय निवडला असून काहीनी आज कामावर सुट्टी घेण्याची वेळ आली आहे.

आज सकाळी दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात झाल्याने मनमाडवरून सुटणारी मनमाड कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. सकाळी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरी पर्यत पोहचली असून तेथूनच ती परत वळविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच नागपूर वरून सुटणारी नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस मनमाड रल्वे स्थानकावर उभी करण्यात आली आहे. तर लासलगाव रेल्वे स्थानकावर गरीबरथ एक्सप्रेस थांबविण्यात आली आहे. आज सकाळी लासलगाव रेल्वे स्थानकावर गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमाने व प्रवासी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती. मात्र गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने त्यांना परत जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT