उत्तर महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha शिंदखेडा शहरात कडकडीत बंद

जितेंद्र मेखे

शिंदखेडा (धुळे) : मराठा समजला आरक्षण, काकासाहेब शिंदे यांच्या जलसमधीचा निषेध व मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची माफी मागावी यासाठी शिंदखेडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक दिली.

आज सकाळ पासून व्यापाऱ्यांनी उस्फुर्त बंदला पाठींबा देत आज कडकडीत बंद पाळला त्यात भाजीपला, मेडिकल या बंद मधून वगळण्यात आले होते. तसेच शाळा व  कॉलेज विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. दुपारी 11 च्या सुमारास येथील भगवा चौकातून रॅली काढून जोरदार घोषणा देत येथील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सुदाम महाजन यांना निवेदन देण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक भूषण पाटील, उल्हास देशमुख, अरुण देसले, नंदकिशोर पाटील, ज्ञानेश देसले, भूषण कौठळकर, सुभाष देसले, पंकज कौठळकर, नगरसेवक उदय देसले, सुरज देसले, बारकू पाटील, निलेश निकम, स्वप्नील पाटील, सुयोग भदाणे, गिरीष देसले, परीक्षित देशमुख, जगदीश देसले, सदाशिव देसले, संजय भामरे, सागर देसले, धनंजय देसले यावेळी उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शाम सनेर, जिल्हा बँक संचालक प्रकाश पाटील, राजेंद्र देसले, शाम पाटील, आबा मुंडे, राजेंद्र देवरे, यांनीही निवेदन दिले.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली याचा निषेध करण्यात येऊन शासनाने त्याच्या कुटुंबियला 25 लाख शासकीय मदत द्यावी. राज्यात होणारी 72 हजार मेघा भरतीस तात्काळ स्थगिती देऊन मराठा आरक्षण लागू झाल्यावर करावी व मराठा समाजाबदद्दल मुख्यामंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्या बद्दल त्यांनी माफी मागावी. तसेच, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा जर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे. यासाठी मराठा समाजातर्फे बंदची हाक देण्यात आली.

शहरातील व्यापारी बंधूनी आज सकाळपासून आपापली दुकाने उस्फुर्त पणे बंद ठेवण्यात आली त्यात शहरातील सर्व माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 3 दिवसांत 56,000 रुपयांनी स्वस्त! 24K, 22K आणि 18K सोनं कितीला? चांदीही नीचांकी पातळीवर

Sangli District Bank Election : दुष्काळाचा 'ड्रामा' अन् सग्यासोयऱ्यांचा 'हंगामा'; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 'या' पॅटर्नची राज्यभर चर्चा

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनला नेमकं काय झालं? दुसऱ्या सामन्यातून घेतली माघार, आता मालिकेला मुकणार? BCCI ने दिले अपडेट्स

Marathi News Live Updates: आधी कारने धडक दिली, रस्त्यावर पडताच लोखंडी रॉडने चेहऱ्यावर वार करत मित्रानेच केला बंटी दीक्षितचा निर्घृण खून

Central Railway: कल्याण-कसारा विशेष ब्लॉकचा प्रवाशांना फटका! लोकलसह एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार; पाहा नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT