maratha-morcha-belgaum-\ 
उत्तर महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha आरक्षणासाठी 9 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात विविधांगानी आंदोलन सुरू असताना, आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्यासाठीच्या बैठकीमध्ये येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजुने न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा सकल मराठा समाजातर्फे याचिकाही दाखल केली जाणार आहे. 

गंगापूर रोड परिसरातील गंगोत्री कन्स्ट्रक्‍शन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीला सुनील बागुल, चंद्रकांत बनकर, अॅड.श्रीधर माने, हंसराज वडघुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील समाजबांधवांनी टप्याटप्याने ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे, न्यायालयीन लढाईसाठी विधी तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्ह्यातर्फे रिट याचिका दाखल केली जाणार आहे. राजकीय आणि बिगर राजकीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. शहर, तालुका, विधी आणि निधी संकलन, शिस्त, माध्यम, नियोजन समितीही स्थापन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

जिल्ह्याची समन्वय समिती 
अॅड. श्रीधर माने, चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे, साहेबराव पाटील, प्रकाश मते, प्राचार्य हरिष आडके, हंसराज वडघुले, हिरामण वाघ, राजेंद्र शेळके, योगेश कापसे, डॉ. उमेश मराठे, हरिदादा निकम, संजय पाटील, साहबेराव दातीर, अशोक पाटील, सुरेश भामरे, सुरेश भामरे, ऍड. विजय कातोरे, मुकुंद भोसले, अशोक कदम, बाळासाहेब घडवजे, भारत निगळ, नाना बच्छाव आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT