abdul sattar 
उत्तर महाराष्ट्र

बाहेरून रेमडीसीव्‍हरचे इंजेक्‍शन मागविल्यास कारवाई; पालकमंत्री सतार यांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

दोंडाईचा (धुळे) : कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकता असेल तरच रेमडीसिव्हिर इंजेक्‍शन द्यावे. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्वरित २०० इंजेक्‍शन पोहचविणार आहे. खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यासाठीही मेडिकल मध्येही टप्प्याटप्प्याने इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात येतील, रुग्णालयात बाहेरून इंजेक्‍शन मागविली जात असेल, तर डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागले. असा दम पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरला. 
नगरपरिषदेच्या सभागृहात शनिवारी (ता. ३) सायंकाळी कोरोनाबाबत आढावा बैठक झाली त्‍यात ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी वांन्मती सी, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

क्रॉस चेकिंग करावी 
मंत्री सत्तार पुढे म्हणाले की, खाजगी मेडिकल वाल्यांनी रेमडिसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्धबाबत चुकीची माहिती दिल्यास अधिकारी पाठवून क्रॉस चेकिंग करावी. उपजिल्हा रुग्णालयाकडून व्हेंटिलेटरसाठी एम डी डॉक्टर उपलब्ध झाल्यास लगेच ऑर्डर देऊन टाकणार. रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देणे बाबत पालिकेने लक्ष घालावे. कोरोनाबाबत आठवड्यातून बैठका घ्यावेत. पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उपजिल्‍हा रूग्‍णालयाकडून उपलब्‍ध करा
कामगार मंडळाच्या इमारतीतील कोविड केअर सेंटर येथे ही रेएमडीसिव्हिर इंजेक्‍शनची मागणी केल्यास उपजिल्हा रुग्णालयाकडून उपलब्ध करून द्यावीत. प्रांताधिकारी डॉ विक्रमसिंह बांदल यांनी कोव्हिड सेंटर मध्ये उपलब्ध सेवासुविधांबाबत माहिती दिली, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी लसीकरण, औषध साठा, आर टी पीसिआर चाचणी, आदींची माहिती दिली, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे, कोविड सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. हितेंद्र देशमुख यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा मांडला. तहसीलदार सुनील सैंदाणे आदी अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, पालिका सभापती, नगरसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी नगरसेवक हितेंद्र महाले, आदींनी बैठकीत कोरोना काळात येणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या. त्यावर चर्चा घडवून आणत प्राप्त परिस्थितीवर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जातील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT