holi 
उत्तर महाराष्ट्र

पालकच बेफिकीर! धूलिवंदनासाठी बच्चेकंपनी रस्त्यावर 

रमाकांत घोडराज

धुळे : कोरोनामुळे यावर्षी होळीनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या धुलिवंदनावरही धुळे शहरात निर्बंध आल्याने या उत्साहाला मर्यादा आल्या, असे असले तरी शहरात एका ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच धूलिवंदनाचा आनंद लुटण्यासाठी पाण्याची टाकी ठेवून व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले. पाण्याची टाकी चौकात असल्याने बच्चे कंपनी होळीच्याच (ता.२८) दिवशी रस्त्यावर उतरून एकमेकांवर पाणी उडवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात लहान मुलांची चूक नव्हे तर पालकांची बेफिकिरी असल्याचेच दिसून आले. दरम्यान, हे चित्र पाहून पोलिसांनी पाण्याची टाकी उचलण्याची सूचना संबंधितांना दिली होती. 

होळीनंतर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन/रंगपंचमीचा उत्साह धुळ्यात वेगळाच असतो. एकमेकांना रंग लावण्यासह एकमेकांवर पाणी टाकणे, डोलचीने पाण्याचा फटकारा मारणे हे तर धुळ्याचे वैशिष्यच. त्यामुळे दरवर्षी चौकाचौकांत पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या असतात. अनेक ठिकाणी पाइपलाइन करून पाण्याच्या फव्वाऱयाची व्यवस्था होते. गाण्यांच्या ठेक्यावर तरुण-तरुणींसह बच्चे कंपनीही या धूलिवंदनाचा आनंद लुटतात. यावर्षी कोरोनामुळे या सर्व उत्साहावर निर्बंध आले आहेत. 

निर्बंध तरीही..
प्रशासनानेही २७ ते ३० मार्चदरम्यान निर्बंध लावल्याने होळीसह इतर सण साजरा करण्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच आज होळीचा सणही साध्या पद्धतीने साजरा झाला. दरम्यान, शहरातील गल्ली क्रमांक-४ मधील जय जवान चौकात आजच लहान मुले एकमेकांवर पाणी टाकत धूलिवंदनाचा आनंद लुटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मुले यात संपूर्णपणे भिजलेली होती. पाण्याच्या व्यवस्थेसाठी चौकात टाकीही ठेवलेली होती. काही मुले तर या टाकीतदेखील उतरलेली होती. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना व त्यासाठी निर्बंध लावलेले असताना पाण्याची टाकी आली कशी असा प्रश्‍न पडतो. लहान मुलांना याची कल्पना असण्याचे कारण नाही त्यामुळे ते तर रस्त्यावर उतरून एकमेकांवर पाणी टाकत भिजण्याचा आनंद लुटत होती. या प्रकारात खरी चूक पालकांची व पाण्याची टाकी ठेवून, टाकीत पाणी भरून देणाऱ्या मंडळींची आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी पाण्याची टाकी उचलण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. अशाच पद्धतीने धूलिवंदनाचा सण साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यंत्रणेलाही सजग राहावे लागणार आहे. 

संपादन - राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग पवार यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात एटीएमजवळ तरुणाला लुटले, २८ हजारांची रोकड चोरी

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

SCROLL FOR NEXT