no mask 
उत्तर महाराष्ट्र

मास्क नसणाऱ्यांना दंड; मंगल कार्यालयावरही कारवाई 

रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेसह पोलिस प्रशासनाकडून मास्क न वापरणे, गर्दी करणे, उपाययोजना न करणे आदींबाबत संबंधितांवर कारवाई सुरू केली. महापालिकेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. तसेच मंगल कार्यालयांचीही पाहणी केली. एका मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून दंड वसूल केला. 
कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपाययोजनांसह नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीही तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. पथकाने शहरातील देवपूर भागातील मंगल कार्यालयातही पाहणी केली. या ठिकाणी विवाह सोहळ्यांतर्गत हळदीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला उपस्थितांची संख्या ५० च्या आत होती. मात्र त्यातील पाच जणांनी मास्क लावलेला नसल्याचे आढळल्याने पथकाने मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून एक हजार रुपये दंड वसूल केला. पथकप्रमुख प्रसाद जाधव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT