vaccination
vaccination vaccination
उत्तर महाराष्ट्र

‘कोणी लस देईल का लस..’ सर्वसामान्यांचा मोठा गोंधळ

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccination) देणे सुरू असले तरी प्रचंड गर्दीमुळे लसीची ऑनलाइन नोंदणी होतच नाही. अवघ्या पाच मिनिटांत कोटा संपतो. ४५ वर्षांवरील व्यक्तींना पहिली तर काहींना दुसरी लस (Second dose) घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ‘कोणी लस देईल का लस’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. (corona vaccination stop dhule district center)

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लशींबाबत सर्वसामान्यांचा मोठा गोंधळ उडत असून सुरवातीला कोव्हॅक्सिन लस मिळाल्यानंतर आता कोविशिल्ड लसी आल्या आहेत. त्याही फक्त ४५ च्या पुढील वयोगटासाठी असल्याने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ४५ ते ६० वयोगटातील प्रौढ चकरा मारत असून त्यांनी दुसरी लस कुठे घ्यावी, असा प्रश्न आहे. एवढ्या कडक उन्हात व कोरोना पसरलेला असताना येथील प्रौढांनी लशीच्या दुसऱ्या डोससाठी कुठे जावे हा प्रश्न आहे. केवळ सोनगीरचा हा प्रश्न नसून जिल्ह्यातील सर्व प्रौढांचा आहे.

दुसऱ्या डोससाठी वणवण

जिल्ह्यात सुरवातीला लसीकरण मंद होते. मात्र कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या वाढत असल्याने घाबरून लोक लसीकरणासाठी गर्दी करू लागले. त्यामुळे ४५ ते ६० वयोगटातील जिल्ह्यातील लाखो लोकांनी पहिला डोस घेतला पण दुसरा डोस मिळण्यापूर्वीच काही रुग्णालयात लसी संपल्या. तर काही रुग्णालयात लसी बदलल्या. कोव्हॅक्सिन घेतलेला दुसरी लस कोविशिल्ड घेऊ शकत नाही. तसेच पहिली लस कोविशिल्ड घेतलेल्यांबाबतही आहे. एक मे पासून १८ ते ४४ वर्षावरील सर्वांना लसीकरण देण्यात येत असल्याने ४५ पेक्षा पुढील ग्रामस्थांना दुसरा डोससाठी वणवण करावी लागत आहे.

युवावर्गात प्रचंड उत्साह

दरम्यान लसीकरणाबाबत युवावर्गात प्रचंड उत्साह आहे. लसीकरणासाठी आरोग्यसेतू किंवा को विन अ‍ॅपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर मॅसेज आल्यावर दिलेल्या तारखेस व वेळेत लस घ्यायला जावे लागते. नोंदणीसाठी अगदी थोडाच वेळ अ‍ॅपमध्ये डाटा ओपन होतो. तेवढ्या वेळात दोनशेंची नोंदी झाली की डाटा बंद होतो. विशेष म्हणजे डाटा कधी ओपन होईल हे सांगता येत नाही. धुळ्यातील एकाकडे ही जबाबदारी दिली असल्याने धुळ्यातील लोकांनाच डाटा ओपन होण्याबाबत माहिती होते. त्यामुळे सोनगीरला निम्मेहून अधिक लस घेणारे धुळ्याचे असतात. हजारो युवकांची नोंदणी होत नसल्याने ते देखील कुठे लस मिळेल का? म्हणून शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT