corona death
corona death sakal
उत्तर महाराष्ट्र

छत्र हरपले अन्‌ पोटाचा प्रश्‍न, शिक्षणाची उमेदच गमावली

सकाळ डिजिटल टीम

कापडणे (धुळे) : हेंद्रूण (ता. धुळे) येथील रवींद्र मोरे व संगीता मोरे या दाम्पत्याचे कोविड १९ (Coronavirus) मुळे निधन झाले. त्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. कोरोना महामारीमुळे ही चौघे मुले अनाथ (Corona death) झाली आहेत. जगण्याचा आधार गमावल्याने या मुलांची अवस्था पाषाणह्रदयीलाही पाझर फोडते. त्यांनी पोटाचा प्रश्न आणि शिक्षणाची उमेदच गमावली आहे. (coronavirus-father-and-mother-death-orphaned-four-siblings)

तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी या मोरे भावंडांची भेट घेतली. अन् निशब्द झाल्या. त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची भेट देत सांत्वन केले. गुरूवारी (ता. १०) तहसीलदार गायत्री सैंदाणे हेंद्रुणला पोहचल्यात. कोरोनामुळे निराधार झालेल्या चौघा बहिणभावांना भेटल्यात. त्यांचे सांत्वन केले. जगण्याची नवी उमेद जागविली. शिक्षणासाठी प्रेरणा दिली.

स्‍वखर्चाने जीवनावश्‍यक वस्‍तूंची मदत

शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याची हमी दिली. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश संबंधित तलाठीस दिले. तहसीलदार सैंदाणे यांनी स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तू शेंगदाणे, साखर, गूळ, तेल, गहू, तांदुळाची मदत केली. दरम्यान यावेळी मंडळाधिकारी एस. के. पारधी, पुरवठा निरीक्षक सुधीर मोहिते, तलाठी भास्कर ठाकरे, तलाठी गजानन सोनवणे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT