remdesivir njection 
उत्तर महाराष्ट्र

रूग्‍णालयात बेड तर नाही रेमडेसिवरचा काळा बाजार

रणजित राजपूत

दोंडाईचा (धुळे) : दोंडाईचा व परीसरात मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमीत रुग्‍णांची संख्या वाढत असल्‍याने उपजिल्हा रुग्‍णालयासह खासगी रुग्नालयातही बेड फूल्ल झाले आहेत. तर दुसरीकडे काही मेडीकल दुकानांमध्ये रेमडेसिवर इंजेक्शन अधिक दराने विक्री करत जनतेची लूट केली जात आहे. 
दोंडाईचा, देवी, विखरण, मालपूर, निमगुळ आदी गावांना कोरोना रूग्‍णांची संख्या वाढत आहे. यामूळे उपजिल्हा रूग्‍णालयासह शहरातील खाजगी रूग्‍णालयही फूल्ल झाले आहेत. परिणामी रूग्‍णांना दाखल करून घेतले नाही. यामुळे पॉझिटीव्ह रूग्‍णांना घरीच जावे लागत आहे. 

रेमडीसेवरची जादा दराने विक्री
रूग्‍णांची वाढती संख्या पाहता जास्‍त त्रास जाणवत असलेया रूग्‍णांना रेमडीसेवर लस दिली जाते. परंतु मेडीकल चालक कोरोनावर उपचार करणारे रेमडेसीवीर इंजेक्शन नऊशे ते साडेनऊशेपर्यत त्यांना मिळते. ते रूग्‍णांना अकराशे रूपयापर्यंत बीलासह विक्री करतात. परंतु काही मेडीकल धारकांकडे हे इंजेक्शन दोन हजार रूपयापर्यंत विक्री करुन ग्राहकांची लूट होत असल्याची चर्चा असून बिल मागितल्यावर नाकारण्यात येते. 

सर..बेड करून द्या हो
दोंडाईचातील शासकिय ग्रामीण रुग्नालयात बेड कोरोना रूग्‍णांनी फूल्ल झाले आहेत. येथील खाजगी रूग्‍णालयात काही कोरोनो रुग्‍णांनी उपचारार्थ धाव घेतली असतांना तेथेही बेड शिल्लक नाहीत. तेव्हा सामाजिक सेवा करणारे व कोरोना योध्दा म्हणुन राज्यपालांच्या हस्ते पूरस्काराने सन्मानित झालेले माजी आरोग्य सभापती यांचे पती सर्व रूग्‍णालयात फेर फटका मारतात; तेव्हा रुग्‍णांचे नातेवाईक व उपचारार्थ आलेल्या रूग्‍णांकडून सर, बेड उपलब्ध करुन द्या हो.. तेंव्हा ते सर संबधीत डॉक्टरांना बेड उपलब्‍धतेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विनवणी करुन रुग्नांना बेड उपलब्ध करून देतात. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT