corona fine 
उत्तर महाराष्ट्र

बापरे नियमांचे उल्‍लंघन करणारे धुळेकर; भरला १४ लाखावर दंड 

सकाळवृत्तसेवा

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाला अटकाव घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुनही ज्या नागरिकांनी नियम-अटींचे उल्लंघन केले त्यांच्यावर प्रशासनाला नाइलाजास्तव कारवाईचा बडगा उचलावा लागला. साधारण वर्षभरापासून ही कारवाई सुरू आहे. या वर्षभरात नियम मोडणाऱ्या धुळेकर नागरिकांनी तब्बल १४ लाख २८ हजार रुपये दंड भरला आहे. ही रक्कम सध्या महापालिकेच्या तिजोरीत जमा आहे. दरम्यान, दंडात्मक कारवाईची ही मोहीम अद्यापही सुरू आहे. 

एप्रिल-२०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळून आल्यानंतर महापालिका व पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजनांना सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कंटेनमेंट झोन नंतर लॉकडाऊनमुळे नागरिकांवर विविध निर्बंध आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाला नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगाही उचलावा लागला. विशेषतः विनामास्क फिरणाऱ्या, फिजिकल डिस्टन्सींग न पाळणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकणाऱ्या, गर्दी करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदार, हॉटेलचालक, डेअरीचालक आदींकडून दंड वसूल करण्यात आला. यासाठी महापालिका व पोलिसांची पथके शहराच्या विविध भागात फिरत होती. कोरोनाचा कहर वाढल्यानंतर या कारवायांना वेग दिला गेला. १०० रुपयांपासून ते हजार, दोन हजार, पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला. या दंडात्मक कारवाईतून आत्तापर्यंत तब्बल १४ लाख २८ हजार ५०० रुपये दंड वसुली झाली आहे. काही दिवसांपासून अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्सचालकांकडूनही दंड वसुली करण्यात येत आहे. 

विनामास्क फिरणारेच अधिक 
दंडात्मक कारवाईतून वसूल झालेल्या रकमेवर नजर टाकली तर सर्वाधिक दंड वसुली शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून झाल्याचे दिसते. २० एप्रिल ते आजअखेर तब्बल आठ लाख ६० हजार रुपये अशा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आले आहेत. त्यानंतर फिजिकल डिस्टन्सींग न पाळणाऱ्यांकडून पावणेतीन लाख रुपये वसूल झाले. 

पुन्हा त्याच दिशेने वाटचाल 
कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची मोठी दहशत होती. तशाही स्थितीत अनेक नागरिक नियम मोडत, अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकदा पोलिसांनाही कठोर भूमिका घ्यावी लागली. कोरोनाची दहशत असतांनादेखील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना दंड भरावा लागला. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळाल्याने कारवाईदेखील कमी झाली. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने, बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. आजही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे दंडाच्या रकमेत पुन्हा वाढ होणार आहे. दंड भरण्यापेक्षा नागरिकांनी नियम पाळून कोरोनाला हद्दपार करावे, अशी अपेक्षा आहे. 

- विनामास्क........................८, ६०,२०० 
- फिजिकल डिस्टन्सींग न पाळणे...२,७५,५०० 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे...........३१,६०० 
- आनुषंगिक कारवाई.................२,६१,२०० 
- एकूण.......................१४,२८,५०० रुपये 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT