vaccination vaccination
उत्तर महाराष्ट्र

लस घ्‍यायचीय तर कोरोना निगेटिव्हचा अहवाल हवा

लस घ्‍यायचीय तर कोरोना निगेटिव्हचा अहवाल हवा

सकाळ डिजिटल टीम

धुळे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. आपल्यापासून अन्य कुणाला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची खबरदारी लसीकरणासाठी (vaccination) येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने बाळगतानाच कोरोना (coronavirus) विषाणूच्या चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची प्रत शक्यतोवर सोबत बाळगावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले. (dhule news coronavirus vacination center nigative report)

जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण करण्यात येईल. तसे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. सुरवातीला फ्रंटलाइन वर्कर व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही स्थिती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीसाठी धोकादायक ठरू शकते. या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रत्येक नागरिकाने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

तर लसीकरण केंद्रावर करावी चाचणी

लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची प्रत शक्यतो जवळ बाळगावी. असा अहवाल ज्या नागरिकांजवळ नसेल, तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून येतील, त्यांची लसीकरण केंद्रांवरच चाचणी करावी. त्यानुसार आरोग्य यंत्रणांनी लसीकरण केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिली आहे. लसीकरण केंद्रांवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर पाळावे, असेही आवाहन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT