kidnaping case 
उत्तर महाराष्ट्र

मुलगी दिली नाही म्हणून तिच्या आईलाच पळविले 

सकाळवृत्तसेवा

धुळे : लग्नासाठी आपल्याला मुलगी दिली नाही तर मुलीच्या आईलाच पळवून नेईल, अशी धमकी देणाऱ्याने खरच मुलीच्या आईला फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद येथील आझादनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 
धुळे शहरातील अभय महाविद्यालयाजवळील रामनगर येथील व्यक्तीने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की १० मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास आपण कामावरून घरी आल्यावर पत्नी घरात आढळून आली नाही. शोध घेतला, नातेवाइकांना विचारले मात्र मिळून आली नाही. दरम्यान, सागर शेषराव हतागडे (रा. राजेंद्रनगर, इंदूर, मध्य प्रदेश) याने मुलगी बघायच्या वेळेस सांगितले होते, की तू जर तुझी मुलगी दिली नाही, तर तुझ्या पत्नीला पळवून नेईल. 

पत्‍नीनेही सांगितले पळवून नेल्‍याचे
पत्नीला फोनवर संपर्क केला असता तिनेही सागर हतागडे याने आपल्याला पळवून नेल्याचे सांगितल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या फिर्यादीवरून आझाद नगर पोलिस ठाण्यात हतागडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल एस. के. सूर्यवंशी तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT