kishor dhamale
kishor dhamale 
उत्तर महाराष्ट्र

मुंबईला महामुक्‍काम आंदोलन; धुळ्यातून जाणार हजारो कार्यकर्ते

रमाकांत घोडराज

धुळे : राज्यातील हजारो शेतकरी- कामगारांचे मुंबईत चार दिवस (ठिय्या) महामुक्काम आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक किशोर ढमाले, श्रमिक शेतकरी संघटनेचे सुभाष काकुस्ते यांनी दिली. 
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राजभवनांवर आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच १८ जानेवारी रोजी 'किसान महिला दिवस' देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी, कामगार २३ ते २६ जानेवारी असे चार दिवस मुंबईत महामुक्काम आंदोलन करतील. 

दीड हजार कार्यकर्ते 
सत्यशोधक शेतकरी सभेचे दीड हजार कार्यकर्ते २३ जानेवारीला साक्री व धुळे येथे क्रांतिवीर तंट्या भिल व नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन मुंबईच्या दिशेने कूच करतील. यात ५०० महिलांचा सहभाग असेल असे संघटनेचे साक्री तालुकाध्यक्ष लालाबाई भोये ,सेक्रेटरी मिरूलाल पवार, संघटक जितेंद्र पवार, धुळे तालुकाध्यक्ष सुरेश मोरे,सेक्रेटरी रतन सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही २५ जानेवारीच्या आंदोलनात सामील होण्याचे मान्य केले असल्याचे काकुस्ते, ढमाले व मालचे यांनी म्हटले आहे. 

असे असेल आंदोलन 
१८ जानेवारीला 'किसान महिला दिवस', २३ जानेवारीला ट्रॅक्टरसह इतर वाहनांतून मुंबईच्या दिशेने कूच, २४ जानेवारीला आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील, २५ जानेवारीला दुपारी दोनला राज भवनाच्या दिशेने कूच, २६ जानेवारीला आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन होईल अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वंजी गायकवाड, जिल्हा सेक्रेटरी यशवंत मालचे, जिल्हा संघटक मन्साराम पवार व अशपाक कुरेशी यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT