farmer help 
उत्तर महाराष्ट्र

विहिरीत पडलेल्‍या शेतकऱ्याला विद्यार्थ्यांनी वाचविले प्राण

सुकलाल सुर्यवंशी

दुसाणे (धुळे) : माळमाथा परिसरातील दुसाणे येथील महात्मा फुले माध्यमिक व श्री हरिभाऊ श्यामराव भदाणे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अकरावीतील जिगरबाज विद्यार्थ्यांनी शेतातील विहिरीत बुडणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवल्यामुळे ग्रामपंचायतमार्फत जीव वाचविणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला. 
सदरची घटना ही शुक्रवार (ता.२६) दुपारी १२ वाजेच्या सुमारी घडली. शेतकरी दिलीप रोहिदास शिंदे हे आपल्या इनामी शेतजमिनीत गवत काढत होते. दुपारची वेळ असल्याने कडक ऊन असल्याने त्यांना चक्कर आल्याने ते सरळ विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नव्हते. विहिरीची खोली १०० फूट व जवळपास ४० फूट पाणी होते. त्यामुळे आपलं मरण समोर दिसत असताना अचानकपणे त्याच शेताच्या पलीकडे काम करणारे सतीश किशोर बागुल व आशिष मुकुंद शिंदे या दोन्ही जिगरबाज विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पाण्यात बुडणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवला. दोघांपैकी आशिष शिंदे यास पोहता येत होते त्याने थेट विहिरीत उडी घेतली तर दुसऱ्याने विहिरीत दोर टाकला. 

पाठीवर घेवून काढले बाहेर
आशिष याने शेतकऱ्यास आपल्या पाठीवर घेऊन दोराच्या साह्याने बाहेर काढले असता शेतकऱ्याला काटे टोचले होते. विद्यार्थ्यांनी त्यांना सरळ दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अशाप्रकारे देशाच्या अन्नदाताचा प्राण त्यांनी वाचवल्यामुळे त्यांचा सन्मान ग्रामपंचायत दुसाणेकडून सत्कार करण्यात आला. प्रसंगी सरपंच सुशिलाबाई ठाकरे, उपसरपंच चारुशीला भदाणे, ग्रा प सदस्य, विवेक पिंपळे, चंद्रकांत महाले, हेमंत खैरनार, ललित वाघ, भीमराव कुवर, जयवंत शिंदे, भगवान भदाणे, योगेश अहिरे, नाना भदाणे, तसेच ग्रामपंचतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT