diposite confiscated 
उत्तर महाराष्ट्र

निजामपूर- जैताणेच्या २८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात साक्री तालुक्यातील निजामपूर व जैताणे या दोन्ही सतरा सदस्यीय ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 28 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. त्यात निजामपूरच्या 25, तर जैताणेच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.

निजामपूरला 17 जागांसाठी सर्वात जास्त 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 17 विजयी उमेदवार व 17 प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता विविध वॉर्डांतील सुमारे 25 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त झाले. तर जैताणेत 17 पैकी 7 जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित 10 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यापैकी 3 उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.

डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार (कंसात मिळालेली मते)
निजामपूर ग्रामपंचायत
: सुनील बागले (5), भिला माळचे (16), पावबा सोनवणे (14), सपना मोरे (16), तांबोळी शेख गणी (35), युसूफ सय्यद (5), इंदूबाई पवार (66), ताहीर मिर्झा (15), अंजनाबाई सोनवणे (40), मुश्ताक पठाण (6), युसूफ सय्यद (1), चिंधु सोनवणे (4), वर्षा जाधव (74), वंदना मोहने (88), मुश्ताक पठाण (24), रवींद्र मोरे (6), चिंधु सोनवणे (1), नोटा (26), दगडू पाटील (6), ताहीर मिर्झा (2), मुश्ताक पठाण (12), सलीम पठाण (40), भूषण पाटील (14), युसूफ सय्यद (1), दिलनूरबी सय्यद (5), अंजनाबाई सोनवणे (3).
जैताणे ग्रामपंचायत - तनुजा जाधव (37), नामदेव पिंपळे (105), राहुल महिरे (105)

‘नोटा’ अधिक प्रभावी
निजामपूरला एकूण 6 हजार 172 मतदारांपैकी 4 हजार 178 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर जैताणेत वॉर्ड क्रमांक पाचमधील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 1 हजार 466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. उर्वरित पाच वॉर्डांतील एकूण 8 हजार 139 मतदारांपैकी 5 हजार 719 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निजामपूरला 373, तर जैताणेत 383 अशा एकूण 756 मतदारांनी नोटाला मतदान केले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT