gram panchayat election 
उत्तर महाराष्ट्र

बालवाडीत शिकणाऱ्या सायलीने केले तीन उमेदवार विजयी; बक्षिस रूपात मिळाले अडीच हजार रूपये 

विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील सुराय, सोनशेलू व नवे कोडदे येथील ईश्‍वर चिठ्ठीमुळे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. ईश्‍वर चिठ्ठी काढणाऱ्या सायली शिंपीला बक्षीस म्हणून तीन उमेदवारांनी अडीच हजार रूपये दिले. 
सोनशेलू ग्रामपंचायतीचे उमेदवार कमलबाई नानाभाऊ गिरासे व रत्ना मनोहर म्हसदे या दोघांना 164 अशी सारखे मते मिळाल्याने ईश्‍वर चिठ्ठीद्वारे उमेदवाराला विजयी करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्‍यानुसार बालवाडीतील सायली शिंपी हिच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात रत्ना म्हसदे यांची चिठ्ठी निघल्याने त्‍या निवडून आल्याचे तहसीलदार सुनील सैदाणे यांनी जाहीर केले. 

पुन्हा दोन ईश्‍वर चिठ्ठी
सुराय- अक्लकोस गृप ग्रामपंचायतीच्या उमेदवार न्हानजी ओंकार चव्हाण व भिमसिंह अंबरसिंह ठाकरे यांना देखील 258 मते मिळाली. दोघाही उमेदवारांना सारखे मते मिळाल्याने पुन्हा सायली शिंपी हिने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत न्हानजी चव्हाण विजयी झाले. नवे कोडदे ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही पूनम प्रविण गिरासे यांना 87 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमिला राजेंद्र रामराजे यांना 87 अशी सारखे मते मिळाल्याने सायली शिंपी हीने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीद्वारे पूनम गिरासे विजयी झाल्‍या.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT