water plant
water plant 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामपंचायतच करतेय वीजचोरी; फिल्‍टर प्लांट बंदमुळे पंधरा दिवसांपासून गावात पाणीच नाही

विशाल रायते

न्याहळोद (धुळे) : येथील पाणी फिल्टर प्लांटसाठी दीड वर्षापासून आकडा टाकून सुरू असलेली वीजचोरी काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनी, कापडणे विभागाच्या अभियंता अंजली हिंगमिरे यांनी पकडून तत्काळ आकडा काढण्यास सांगितल्याने वॉटर फिल्टर पंधरा दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. तर यामुळे ग्रामस्थांना वॉटर सप्लायचेच दूषित पाणीच प्यावे लागत असल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
न्याहळोद येथे दीड वर्षापूर्वी वॉटर फिल्टर प्लांटची १४ व्या वित्त आयोगातून उभारला होता. ग्रामस्थांना शुद्ध व फिल्टर पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने फिल्टर प्लांटची उभारणी केली आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी अधिकृत जोडणीद्वारे वीजमीटर न घेता थेट वीजवाहक तारांवरच आकडा टाकून वीजचोरी करण्यात आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पाच रूपयात पंधरा लिटर पाणी
पांझरा नदी काठाजवळीलच वॉटर फिल्टर योजनेचे पाणी प्यावे लागत तेथील वॉटर सप्लाय विहिरीजवळ आत्माराम नगरचे गटारीचे व शौचालयाचे दूषित पाणी विहिरीत येत असून, तेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. केवळ पाच रुपयांत १५ लिटर पाणी प्यायला मिळत असल्यामुळे ग्रामस्थांसाठी ते हितकारक असून, नेहमीच फिल्टर पाणी प्यायच्या सवयीमुळे विहिरीचे पाणी पिल्याने घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. वॉटर फिल्टरमुळे ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचे आर्थिक साधन निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत अडीच ते तीन लाखांपर्यंत निधी गोळा झाल्याचे कर्मचारी चेतन जिरे यांनी सांगितले. 
 
आम्ही लवकरच डिमांड नोट भरून स्वतंत्र मीटरची व्यवस्था करीत असून, मीटरची व्यवस्था झाल्यावर वॉटर फिल्टर सुरू करण्यात येईल. 
- योगराज पवार, उपसरपंच 
 
वीजचोरी प्रकरणी ग्रामपंचायतीवर कारवाई करणार आहे. तसेच त्‍यांनी कंपनीकडे डिमांड नोट भरल्यावरच वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. 
- अंजली हिंगमिरे, अभियंता, वीज वितरण कंपनी 
 
माझी बदली होऊन येथे आल्यानंतर ग्रामपंचायतीने आकडे टाकल्याचा प्रकार लक्षात आला. याबाबत सरपंच, गटप्रमुखांशी चर्चा केली असता त्‍यांनी आपण लवकरच डिमांड नोट भरून वीजमीटर घेऊ, असे सांगितले होते. 
- किशोर शिंदे, ग्रामसेवक, न्याहळोद 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT