Increased-service-of-medical-officers Increased-service-of-medical-officers
उत्तर महाराष्ट्र

वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा वाढली

वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा वाढली; सेवानिवृत्तीचे वय आता ६२ पर्यंत

पी. एन. पाटील

नवलनगर (धुळे) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तलयातर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ पदावरील सर्व कार्यरत अधिकाऱ्यांचे (Medical officer Increased service) सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे. (Increased-service-of-medical-officers-Retirement-age-two-year)

सध्या राज्यात कोरोना साथरोग संसर्गाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वेगाने वाढत असून त्याचबरोबर नजीकच्या कालावधीत तिसरी लाट येणार असल्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागास नितांत आवश्यकता आहे. त्यातच ३१ मे २०२१ अखेर गट अ मधील विविध संवर्गातील १९३ अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत कोविड-१९ (Covid 19) च्या वाढता प्रादुर्भाव बघता अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ३१ मे २०२१ पासून ३१मे २०२२ पर्यंत शासन निर्णय अमलात राहणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव वि. पु. घोडके यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार ३१ मेस आदेश काढला आहे.

आरोग्य सेवेतील रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी तसेच विशेषज्ञ पदासाठी प्रयत्न करून देखील पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध झाल्यावर देखील पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास सेवेत रुजू न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी आरोग्य सेवेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत असल्यामुळे त्याचा राज्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी काढलेले शासन निर्णय २९ ऑगस्ट २०१८, १ जुलै २०१९, २६ नोव्हेंबर २०१९ यात निवृत्ती संदर्भात वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. ३१ मे च्या निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पदावरील सर्व कार्यरत अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय एक वर्षासाठी ६२ वर्षापर्यंत वाढविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT