mahavitaran 
उत्तर महाराष्ट्र

वीज बिलांसाठी अडवणूक; शेतकरी, वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी 

सकाळवृत्तसेवा

नेर (धुळे) : नादुरुस्त रोहित्र दुरुस्त न करता कृषी धोरणाच्या नावाने शेतकऱ्यांकडून अवेळी वीजबिलाची वसुली केली जात आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नेर येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन रोहित्र दुरुस्तीची अभियंता भटु सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून त्वरित रोहित्र दुरुस्त करून पिके येईपर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यामुळे शेतकरी आणि वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज अभियंत्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

वीज वितरण कंपनीकडून रोहित्र दुरुस्ती न करता शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती केली जात आहे. ऐनवेळी एवढा पैसा कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. या वेळी शेतकरी आणि वीज अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने कृषी धोरणाच्या नावाने अवेळी शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्याचे छडयंत्र रचले आहे. शेतकऱ्यांनी आपली सर्व जमापुंजी पीक संवर्धनासाठी वापरलेली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा केल्याने रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहे. नवीन रोहित्रासाठी वीजबिले भरण्याचे सांगितले जात आहे. परंतु शेतकऱ्यांकडे सद्या पैसे नसून माल निघाल्यानंतर बिल भरू तोपर्यंत सवलत देऊन नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर सतीश बोढरे, कैलास माळी, विठ्ठल गवळे, भगवान माळी, रवि गवळे, तुषार सैदाणे या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

Accident : नातेवाइकांच्या अंत्यविधीहून परतताना मृत्यूची झडप; पाटोळेतील नागरे दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT