fraud case sakal
उत्तर महाराष्ट्र

बनावट कागदपत्रांद्वारे २६.४५ कोटींचा गैरव्यवहार

बनावट कागदपत्रांद्वारे २६.४५ कोटींचा गैरव्यवहार

सकाळ डिजिटल टीम

धुळे : शहरातील लुपीन फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कागदपत्रांवरून बनावट दस्तऐवज (lupin foundation fraud 26 crore) तयार करत बनावट कंपनी स्थापन करून सुमारे सव्वीस कोटी ४५ लाख १७ हजार ९०० रुपयांचा गैरव्यवहार करून जीएसटी (GST no return and Duplicate document) न भरता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन लेखापालसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (dhule-news-lupin-foundation-fraud-26-crore)

याविषयी लुपीन फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक नीलेश पवार (रा. यशोधन कॉलनी, वलवाडी, देवपूर, धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संस्थेत इम्रान शेख (वय ३३, रा. मच्छीबाजार) कामाला होता. त्यामुळे त्याच्याकडे विश्वासाने आधारकार्ड, पॅनकार्डच्या प्रती कार्यालयीन कामासाठी दिल्या होत्या; परंतु इम्रानने गैरफायदा घेत या कागदपत्रांचे बनावटीकरण केले. तसेच त्या आधारे बनावट टेक्स्टाइल कंपनी स्थापन केली. १३ मार्च २०२१ ला दुपारी बाराच्या सुमारास कार्यालयीन काम करताना पवार यांना त्यांचा नंदुरबार येथील मित्र जितेंद्र सोनवणे यांनी दूरध्वनी करून सांगितले, की तुमच्या पॅन क्रमांकावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. तसेच व्यवहार त्यांचे सहकारी अनिल दोरिया यांच्याबाबतीत झाल्याचे सांगून जीएसटी पोर्टलवर जाऊन चौकशी करण्यास सांगितले.

वेगवेगळे व्यवहार आढळले

नीलेश पवार यांनी त्यांच्या पॅनकार्ड क्रमांकाची माहिती घेतली असता त्यांच्या पॅनकार्ड क्रमांकावरून कृष्णा टेक्सटाईल सर्व्हे नं. ५६/२ इ/निहालनगर, मालेगाव या नावाने जीएसटी नोंदणी केल्याचे आढळले. ही माहिती घेतल्यानंतर नीलेश पवार यांनी बँक खात्याविषयी फॉर्म २६ एएसची माहिती काढली. तेव्हा त्यात १७ डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२० या कालावधीत वेळोवेळी एकूण २६ कोटी ४५ लाख १७ हजार ९०० रुपये रकमेचे वेगवेगळे व्यवहार केलेले आढळले. कंपनीच्या माध्यमातून इम्रान शेख व इतरांनी सुमारे सव्वीस कोटी ४५ लाख १७ हजार ९०० रुपयांचा व्यवहार केला. तसेच याबाबत जीएसटी भरला नाही. तसेच व्यवहार नीलेश पवार यांनीच केले, असे दर्शवले. यातून जीएसटी व पर्यायाने शासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार शेख व त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांविरूद्ध विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल झाला. संशयित इम्रान शेख याची पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश शनिवारी (ता.२९) न्यायालयाने दिले.

जीएसटी उपायुक्तांकडे स्वतंत्र तक्रार

बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करून नेमका किती रुपयांचा जीएसटी चुकवला, यासंबंधीची माहिती पोलिस यंत्रणा घेत आहे. त्यासाठी जीएसटी विभागाचे सहकार्य घेतले जात असून, लुपीन फाउंडेशनचे असिस्टंट प्रोग्राम मॅनेजर नीलेश पवार यांनी झालेल्या गैरव्यवहाराबाबत जीएसटी उपायुक्त, नाशिक यांच्याकडे स्वतंत्र तक्रार केल्याचेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT