bus wifi
bus wifi 
उत्तर महाराष्ट्र

बसमधील वाय-फाय सेवेचा कनेक्‍ट तुटला; बॉक्‍स झाले शोभेची वस्‍तू 

महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (धुळे) : राज्य परिवहन महामंडळाने काही वर्षांपूर्वी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी वाय-फाय सेवा सुरू केली खरी, मात्र मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे इंटरनेट सेवा स्वस्त झाल्याने बसमध्ये बसवलेल्या वाय-फाय सेवेचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडे वेळेच नसल्याने चित्र आहे. परिणामी बसमध्ये हजारो रुपये खर्च करून बसविलेले वाय-फाय सेवेचे बॉक्स शोभेची वस्तू बनले आहेत. 
स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा शिवनेरी ते साध्या बसमध्येही आहे. या सर्व बसमध्ये वोट गो मार्फत वाय-फाय सेवेचे बॉक्स बसविले. 

आपला फोर जी प्लॅन बरा
शहरी भागासह ग्रामीण भागात धावणाऱ्या बहुतांश बसमध्ये ही सुविधा आहे. याद्वारे प्रवाशांना स्मार्टफोनवर मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिका विनाशुल्क पाहण्याची सुविधा आहे. या सुविधेचा वापर कसा करावा, याचे स्टीकर प्रत्येक सीटसमोर लावले आहे. मात्र आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये फोर जी सेवेचा वापर होत आहे. शिवाय विविध मोबाईल कंपन्यांचे अमर्याद इंटरनेट वापराचे प्लॅन स्वस्तात उपलब्ध आहेत. 

सुचना वाचून कनेक्‍ट कोण करणार
इंटरनेटचा वापर करून हवे ते एका क्लिकवर पाहता येणे शक्य आहे. त्यामुळे बसमधील वाय-फाय सेवेचा वापर करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करत बसण्याइतका वेळेही प्रवाशांकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय बसमधील वाय-फायमध्ये इंटरनेट व व्हॉट्सॲप सेवेचा वापर करता येत नाही. परिणामी बसमधील या लोकप्रिय सेवेला आता उतरती कळा लागल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT