mahavitaran connection cut 
उत्तर महाराष्ट्र

महावितरणकडून १५३ गावांची ‘बत्ती गूल’; गावे अंधारात

विनोद शिंदे

कुसुंबा (धुळे) : ग्रामपंचायतींनी वीजबिल न भरल्याने महावितरणच्या नऊ विभागांतील ७२ ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या १५३ गावांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. 
कृषिपंपासह घरगुती वीजपुरवठा खंडित करत असताना आता महावितरणने गावातील पथदिव्यांचा व गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत आर्वी, नेर, नेर (ग्रामीण), बोरवीर, शिरूड, कुसुंबा, देऊर, खेडा, मुकटी आदी नऊ विभागांत ७२ ग्रामपंचायती असून, १५३ गावांचा समावेश आहे. आधीच कोरोना काळ सुरू असून, त्यात पथदिवे बंदची भर पडली आहे. ग्रामीण भागातील नागरिक चिंतेत आहेत. संबंधितांनी लवकर वीजबिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून नोटिसाही बजावल्या आहेत. 

गावांची थकबाकी २६ कोटी
धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत नऊ विभाग आहेत. त्यात ७२ ग्रामपंचायतींचा समावेश असून, १५३ गावे आहेत या गावांची एकूण थकबाकी २६ कोटी १३ लाख रुपये आहे, तर वॉटर सप्लाय (गावाला पाणीपुरवठा करणारे पंप) एकूण ११४ ग्राहक असून, ४६ ग्राहकांचे वॉटर सप्लाय पंपचे कनेक्शन खंडित केले आहे. त्यांची थकबाकी तीन कोटी ६३ लाख रुपये आहे. एकूण ग्राहक ११४ ची वॉटर सप्लाय एकूण दहा कोटी २० लाख रुपये थकबाकी आहे. 
 
संबंधितांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणसह शासनाला सहकार्य करावे, महावितरण आपल्यासाठीच आहे. उपविभागात कोट्यवधींची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे. अधिकाऱ्यांना वीजबिल भरण्याची अपेक्षा असते, काही ठिकाणी अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधून ठेवले व चपलांचा हार घातला हे निषेधार्ह आहे. याचा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेकडून निषेध आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत व अधिकाऱ्यांना वेठीस धरू नये, महावितरणला सहकार्य करावे. 
- शशिकांत गांगुर्डे, शाखा अभियंता, कुसुंबा 
 
संपादन – राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT