dam 
उत्तर महाराष्ट्र

चार बंधाऱ्यांचे खोलीकरणविनाच लाखोंचे बिल अदा 

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : येथील शेती शिवारातील चार बंधार्‍यांचे खोलीकरण विनाच वीस लाखावर बिल अदा झाले आहे. आता या कामाची स्पॉट पाहणी चौकशी सुरु झाली आहे. संबंधित ठेकेदारासह मुक्त हस्ते बील अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक जागरुक गाव अशी ओळख कापडणेची आहे. येथेच अशी अवस्था असेल तर जिल्ह्यात किती बोगस कामे होत असतील. या कामाची चौकशी होवून कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

खोलीकरण झालेच नाही  
येथील भात नदी, भारा नाला व दुधई नाल्यावरील चार बंधार्‍याचे खोलीकरण एक वर्षांपूर्वी मंजूर झाले. काम सुरु करण्याचा नारळही फुटला नाही. त्यानंतर कागदोपत्री काम पुर्ण दाखवित वीस लाखापेक्षा अधिक रक्कम हडप झाली आहे. ही बाब लक्षात येताच येथील शेतकऱ्‍यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. 

चौकशी समितीकडून स्पॉट पंचनामे 
चारही बंधाऱ्यांचे शाखा अभियंता के. डी. देवरे व उपअभियंता हितेश भटूरकर (शिरपूर) यांनी स्पॉट पंचनामे केलेत. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, माजी सरपंच भटू पाटील, माजी उपसरपंच मनोज पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानदीप पाटील, बिल्लू पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 
 
कापडणेसारख्या अती जागरूक गावात न झालेल्या कामाची रक्कम हडप होत आहे. इतर गावांमध्ये न झालेल्या कामांची संख्या शेकड्यावर असेल. तेव्हा सखोल चौकशी व्हावी. दोषींकडून वसुलीसह त्यांचे निलंबन व्हायला हवे. 
- नवल पाटील, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT