kunal patil 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांची वर्णी; कार्यकारी अध्यक्ष म्‍हणून निवड

राजेश सोनवणे

धुळे : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल करण्यात आले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल रोहिदास पाटील यांची वर्णी लागली आहे. राज्‍याच्या कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष म्‍हणून त्‍यांची निवड करण्यात आली आहे.

राज्‍य काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्ष म्‍हणून नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष राज्यात नेमण्यात आले आहेत. यामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. त्‍यांच्या समवेत शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरिफ नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची निवड कार्यकारी अध्यक्ष म्‍हणून करण्यात आली आहे.


काँग्रेसची ध्येय धोरण आणि विचार तळगाळापर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम नवीन टीमच्या माध्यमातून करण्यात येईल. मावळते अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भक्‍कमपणे धुरा सांभाळली. आता येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला गतवैभव कसे प्राप्त होईल यासाठी नाना पटोले यांच्या मागदर्शनाखाली नवीन टिम काम करेल हा विश्‍वास आहे.
- कुणाल पाटील, आमदार, धुळे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT