shiv temple 
उत्तर महाराष्ट्र

मुस्लिम शेतकऱ्याची चर्चा: मंदिर बांधून महादेवाच्या पिंडीसह केली नंदीची प्राणप्रतिष्‍ठा

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : विविध प्रकारच्या मंदिरांसाठी देणगी देणाऱ्यांची कमी नाही. स्वखर्चाने देवदेवतांची मंदिरे बांधणारेही कमी नाहीत. आई-वडिलांच्या स्मृतीसाठी मंदिरे उभारली जातात. पण बिलाडी (ता. धुळे) येथील पिंजारी मुस्लिम समाजातील शेतकऱ्याने अकाली निधन पावलेल्या बैलाच्या स्मृतीसाठी चक्क साडेसात लाखांचे मंदिरे उभारले अन् बैलाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून देवत्व बहाल केले. विशेष म्हणजे मंदिर बांधणे ही वडिलांची इच्छाही पूर्ण केली. या मुस्लिम शेतकऱ्याची खानदेशात चर्चा सुरू आहे. 
पस्तीस फूट उंचीचे मंदिर बांधून रंगकाम झाले. त्यानंतर शोभायात्रा काढत मूर्तींची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. मंदिरात केवळ बैलाचीच मूर्ती बसविली, असे नाही. तर महादेवाची पिंड आणि देवी पार्वतीची मूर्तीही प्रतिष्ठापित केली आहे. केवळ मूर्तींसाठी लाखावर खर्च झाला आहे. 

हे एकतेचे दर्शनच म्‍हणावे
मुस्लिम शेतकऱ्याने हिंदू मंदिर उभारल्याने माणुसकीचा, समतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. शेतकरी पिंजारी यांच्या विधायकतेचे परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान, मंदिर बांधण्यासाठी जुन्या धुळ्यातील विलास फुलपगारे यांनी जागा उपलब्ध करून दिली. ग्रामस्थांनी मिरवणूक आणि प्राणप्रतिष्ठेला भव्यदिव्यतेचे स्वरूप दिल्याने येथे सामाजिक एकतेचे दर्शन घडले. 
 
ये तो अब्बा की ख्वॉईश 
बिलाडी येथील अल्लाउद्दीन पिंजारी यांच्या जिवलग बैलाचा वीस वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला. त्यांचे वडील सांडू पिंजारी यांनी हिंदू प्रथेनुसार अंत्ययात्रा काढत शेतात दफनविधी केला होता. त्या बैलाचे मंदिर बांधण्यांची त्यांची तीव्र इच्छा वीस वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. त्यासाठी तब्बल साडेसात लाख खर्च केले. अब्बा की ख्वाईश पूर्ण झाली, हेच समाधान असल्याचे अल्लाउद्दीन पिंजारी यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे शतक थोडक्यासाठी हुकले... पठ्ठ्याने ५ विश्वविक्रमांसह राजस्थानला सावरले, गुजरातसमोर तगडे लक्ष्य

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

SCROLL FOR NEXT