teacher 
उत्तर महाराष्ट्र

जामीनकी कर्जाच्या व्याजदरात एक टक्क्याने घट 

सकाळवृत्तसेवा

कुसुंबा (धुळे) : सदर संस्थेची सन २०१९-२० आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण सभा किसान विद्या प्रसारक संस्था संचलित के. व्ही. टी. आर. सीबीएससी स्कूल, शिरपूर येथे शनिवारी (ता.२७) शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे व्हा. चेअरमण अनिल नहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेचे संचालक शरद पाटील यांनी संस्थेची कर्ज वाटप व ठेवी संदर्भात विविध प्रकारची माहिती दिली. 
गटनेते रवींद्र खैरनार यांनी अहवाल काळात झालेला आर्थिक पत्रकांचा इतिवृत्तांसह सभासदांना व संस्थेस उद्देशून मार्गदर्शन केले. संस्थेच्या कर्जवाढ व कर्जमुक्ती फंड योजनेत पोटनियमातील बदलासंदर्भात माहिती दिली. संस्थेचे प्र. जनरल मॅनेजर महेंद्र शिंदे यांनी सभेपुढे येणाऱ्या विषयांचे वाचन केले. प्रत्येक विषयासंबंधित सर्व माहिती सभासदांना गटनेते रवींद्र खैरनार यांनी विषय वाचन वेळी दिली. त्यामुळे सभासदांनी सर्व विषयांना बहुमताने चॅटींगद्वारे मंजुरी दिली, याचवेळी आर्थिक पत्रकांचा अभ्यास करून येणाऱ्या काळात नियोजन करून सभासदांचे जामीनकी कर्जाचा व्याजदर १३ टक्के वरून १२ टक्केवर आणण्याचा धाडसी निर्णय घेऊन सभेत संचालक मंडळाकडून गटनेते रवींद्र खैरनार यांनी घोषणा केली. यामुळे येणाऱ्या काळात संस्थेवर सुमारे ५३ लाखांचा आर्थिक बोजा पडणार असल्याचे सभेत सूतोवाच केले. सभा युट्युबवर ऑनलाईन असल्याने बहुसंख्य सभासदांनी कॉमेंट बॉक्समध्ये चॅटिंग करून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यात प्रामुख्याने संस्था व सभासद यांच्याबाबत योग्य दिशा आहे, असे नमूद केले. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला सभेत गटनेते खैरनार यांनी योग्य पद्धतीने समजावून उत्तर दिले. त्यामुळे सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. 
ऑनलाइन सभेत सभासद राजेंद्र नांद्रे, प्रवीण भदाणे, विजय खैरनार, बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे, संजय पाटील, सुनील नहिरे, भगवान सोनवणे, ए. के. पाटील, रवींद्र देवरे, सुधीर सोनवणे, डी. डी. पाटील, सतीश निकम, रत्नाकर भोईटे, दशरथ मोरे, दिलीप वाडेकर, वंदना सावंत, कविता फटकाळ, रुखमा पाटील आदी सभासदांनी भाग घेतला. पॅनल प्रमुख गमन पाटील यांनी संस्थेच्या पोटनियम संदर्भात माहिती देऊन योग्य दिशा दिली. आभार संचालक शरद पाटील यांनी मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT