house fire 
उत्तर महाराष्ट्र

गॅस गळती अन्‌ संसाराची राखरांगोळी; ट्रॅक्‍टरसाठीच्या पैशांचीही राख

भरत बागूल

पिंपळनेर (धुळे) : येथून जवळच असलेल्या वाकी (ता. साक्री) येथे गॅस गळतीमुळे घराला आग लागल्याची घटना बुधवारी घडली. यात चार कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. आगीत रोख रकमेसह सुमारे 16 ते 17 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाकी (ता. साक्री) येथे साहीसिंग मांग्या भारुडे, भुया रायसिंग भारुडे, दानील रेश्मा भारुडे यांचे कुटुंब एकत्र राहते. घरातील सदस्य संख्या 17 एवढी आहे. भारूडे यांच्या घराला बुधवारी दुपारी गॅस गळतीमुळे आग लागली. आगीत चारही कुटुबाचे संसारपयोगी साहित्य, कपडे, धान्य जळून खाक झाले. घरात आणखी दोन सिलिंडर असल्याने स्फोट होईल या भीतीने कोणीही आग विझविण्यासाठी सुरवातीला पुढे येत नव्हते. 

ग्रामस्‍थांनीच घेतला पुढाकार
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे यांनी अग्निशमनदलाला फोन केला. मात्र ते आले नाही. अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. जवळच सुरू असेलल्या बांधकामाच्या ठिकाणावरून ग्रामस्थांनी टँकरने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटना घडली तेव्हा घरातील सदस्य शेतात गेले होते. त्यामुळे सुदैवाने प्राणहानी टळली. 

सात लाखापर्यंत नुकसान
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी आगीचा पंचनामा केलेला आहे. या आगीत सुमारे 16 ते 17 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे हे कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांच्यावर फक्त अंगावरचे कपडे राहिले आहेत. तरी महसूल विभागाने तत्काळ लक्ष देऊन त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जालमसिंग देसाई व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे यांनी शासनाकडे केलेली आहे. दरम्यान वाकी येथे घराला लागलेल्या आगीबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

ट्रॅक्टरसाठी ठेवलेले पैसे जळून खाक
दानील रेश्मा भारुडे याला नवे ट्रॅक्टर घ्यायचे होते. याकरीता घरात दोन लाख रुपये शिल्लक ठेवले होते. पण या आगीमध्ये संपूर्ण पैसे जळून खाक झाल्याचे भारुडे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT