bird flu 
उत्तर महाराष्ट्र

बर्ड फ्लूमुळे तीन महिने प्रतिबंधित क्षेत्र; धुळे जिल्‍हाधिकारींचे आदेश

रमाकांत घोडराज

धुळे : मेहेरगाव (ता.धुळे) येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजय यादव यांनी मेहेरगाव येथील संबंधित ठिकाणचा दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने आवश्‍यक उपाययोजना, कार्यवाहीचा आदेशही श्री. यादव यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे. 

देशासह राज्यात ठिकठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत होती. आत्तापर्यंत बर्ड फ्लूचा धोका नसल्याने दिलासा होता. दरम्यान, मेहेरगाव (ता.धुळे) येथील गट क्रमांक ३७६ येथे बर्ड फ्लू आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. यादव यांनी बर्ड फ्लूचा प्रसार जिल्ह्यात अन्य ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेता बर्ड फ्लूचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही सुरू केली आहे. 

शीघ्र कृती पथक नियुक्‍त
मेहेरगाव (ता.धुळे) येथील गट क्रमांक ३७६ पासून किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शीघ्र कृती पथकास (रॅपिड रिस्पॉन्स टिम) आदेशित केल आहे. 

तीन महिने प्रतिबंध 
सदर परिसर, कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करून दहा किलोमीटर त्रिज्या असलेल्या परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा/प्रदर्शने आयोजित करण्यास पुढील ९० दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दहा किलोमीटर परिसरातील गावातील आवागमन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आदेशात म्हटले आहे. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी निश्चित केलेल्या जबाबदारीप्रमाणे कार्यवाही करावी, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही आदेशात नमूद केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT