police fir sakal
उत्तर महाराष्ट्र

'त्या' अधिकारी विरोधात अखेर गुन्हा दाखल

'त्या' अधिकारी विरोधात अखेर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

साक्री (धुळे) : येथील पंचायत समितीच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालयाशेजारी अनेक वर्षापासून असलेल्या शिवमंदिर आणि तेथील देवी देवतांच्या प्रतिमांची विटंबना करणाऱ्या प्रभारी भूमी अभिलेख उपअधीक्षक एम. सी. गाडगे यांच्याविरुद्ध सोमवारी (ता. १४) रात्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी १२ जूनला येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्याकडे निवेदन देत मागणी केली होती.

पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील अनेक वर्षांपासून लहानसे शिवमंदिर उभारण्यात आले होते. तेथे अनेक देवदेवतांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या होत्या. येथील प्रभारी भूमी अभिलेख उपअधीक्षक एम. सी. गाडगे यांनी कार्यालयातील शिपायांवर दबाव टाकून देवदेवतांच्या प्रतिमा उचलून बाहेर फेकून देण्यास भाग पाडले. या प्रकरणी १२ जूनला अधिकारी गाडगेंवर कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांच्याकडे केली होती.

सर्व पक्षीय बैठकीत निषेध

शिवमंदिराच्या विटंबनेची पाहणी करत अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर, नायब तहसीलदार गोपाल पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पंचायत समितीचे उपसभापती अॅड. नरेंद्र मराठे, सहकार आघाडीचे संयोजक योगेश भामरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे, भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, पिंपळनेर मंडळाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र देसले, उपाध्यक्ष राकेश दहिते, भाजपचे शहराध्यक्ष कल्याण भोसले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, प्रसिद्धिप्रमुख राकेश अहिरराव, शिवकल्याण प्रतिष्ठानचे धनराज चौधरी, विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सह सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. बैठकीत भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी उपअधीक्षक गाडगे यांनी केलेल्या प्रकाराचा निषेध करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. त्‍यानुसार सोमवारी (ता. १४) रात्री शहरातील विनोद पाटील (वय ४३, रा. साक्री) यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात उपअधीक्षक एम. सी. गाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT